पशुधनपालकांना गोबर गॅसचे अनुदान आता साडेतेरा हजार

By Admin | Updated: September 24, 2014 23:43 IST2014-09-24T23:43:08+5:302014-09-24T23:43:08+5:30

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन या केंद्र शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गोबर गॅसच्या अनुदानात वाढ झाली आहे. आता १३ हजार ७०० रुपये जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार आहे.

Subsidy of Gobar gas to livestock farmers is now 1,600,000 | पशुधनपालकांना गोबर गॅसचे अनुदान आता साडेतेरा हजार

पशुधनपालकांना गोबर गॅसचे अनुदान आता साडेतेरा हजार

नेर : राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन या केंद्र शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गोबर गॅसच्या अनुदानात वाढ झाली आहे. आता १३ हजार ७०० रुपये जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मिळणार आहे. अनुदानात पुर्वीपेक्षा दोन हजार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे.
शेतकरी कुटुंबाचा इंधनावरील खर्च कमी व्हावा, पर्यावरणाचा समतोल राखला जावा, उत्तम सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे, यासाठी अनुदानातून बायोगॅस निर्मितीची योजना सुरू झाली. या अंतर्गत शासनाकडून गोबर गॅस बांधणीसाठी आठ हजार रुपये आणि स्वच्छता गृहासाठी एक हजार रुपये देते. आता जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अडीच हजार रुपये दिले जाईल, असे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
शेतकरी कुटुंबाकडून स्वयंपाकासाठी गोबर गॅसचा उपयोग होतो. यातून सेंद्रिय खताची निर्मिती होते. गोबर गॅसद्वारे शेतकऱ्यांना तीन किंवा पाच हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटरही चालविता येतात, अशा या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक कृषी अधिकारी पल्लवी देशमुख यांनी केले आहे.
या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी यापूर्वी लाभ न घेतल्याचा ग्रामसेवकाचा दाखला, सातबारा, आठ-अ चा उतारा, किमान चार जनावरे असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला अशा प्रकारची कागदपत्र घेवून पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क करता येईल, असे कृषी अधिकारी रमेश सव्वालाखे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Subsidy of Gobar gas to livestock farmers is now 1,600,000