शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: September 7, 2014 00:10 IST

पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश क्षमता वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी येथील प्रकल्प कार्यालयात शनिवारी तीन तास ठिय्या दिला.

पांढरकवडा : पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश क्षमता वाढवून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी येथील प्रकल्प कार्यालयात शनिवारी तीन तास ठिय्या दिला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी यवतमाळ येथील वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता ८५ ने वाढवून दिल्याचा आदेश वाचून दाखविल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यवतमाळ येथील तीन आणि पांढरकवडासह जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशास इच्छुक जवळपास १०० विद्यार्थ्यांनी दुपारी १ वाजता प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. त्यावेळी अनेक कर्मचारी बाहेर निघून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकाऱ्यांना देऊन नारेबाजी सुरू केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न झाला. परंतु विद्यार्थी आपल्या भूमीकेवर ठाम होते.दुपारी ४ वाजता प्रकल्प अधिकारी प्रशांत रुमाले यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्यापुढे वाढीव जागांसह शिष्यवृत्ती, पुस्तके, भोजन आदी समस्यांचा पाढा वाचला. यावर प्रकल्प अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देतानाच यवतमाळ येथील वसतिगृहाला ८५ जागा वाढवून दिल्याचा आदेश वाचून दाखविला. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रफुल्ल गेडाम, रामेश्वर कुमरे, किशोर शेडमाके, धर्मेंद्र मेश्राम आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)