शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना लर्निंग फ्रॉम होमची सक्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात होणार होत्या. त्यामुळे त्यांचे फार शैक्षणिक नुकसान झाले नाही. तसेही सध्या उन्हाळी सुट्या दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सुट्यांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.

ठळक मुद्देशिक्षकांना विम्याचे कवच द्या : प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सुट्यांचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा आणि कोरोना परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकांना विम्याचे कवच मिळावे यासह इतर मागण्यांसाठी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ सरसावला आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात होणार होत्या. त्यामुळे त्यांचे फार शैक्षणिक नुकसान झाले नाही. तसेही सध्या उन्हाळी सुट्या दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सुट्यांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचे बहुतेक पालक मोलमजुरी, शेतमजुरी करून जगणारे आहे. लॉकडाऊनमुळे ते मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यांच्याकडे कोणत्याही स्मार्ट फोनची व्यवस्था नाही. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी नेटवर्कचा प्रश्न आहे. साधे मोबाईल रिचार्जअभावी बंद पडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांना लर्निंग फ्रॉम होमची सक्ती करू नये, असे म्हटले आहे.कोरोनामय परिस्थितीत अनेक शिक्षक कर्तव्य बजावत आहे. त्यांना आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे विम्याचे कवच द्यावे, शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषद शाळांना हँडवॉश व साबणाचा पुरवठा करून शालेय परिसर संबंधित ग्रामपंचायत मार्फत सॅनिटायझर करून द्यावा, शालेय पोषण आहार बिल प्रत्यक्ष मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा न होता केवळ मॅसेज येत आहे. या प्रकाराची चौकशी करून कारवाई व्हावी, सहाव्या वेतन आयोगाचे काही शिक्षकांचे प्रलंबित हप्ते जमा करावे, प्रलंबित चट्टोपाध्याय प्रकरणे निकाली काढावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे.यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव यांच्या नेतृत्त्वात शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन दिले. यावेळी आसाराम चव्हाण, श्रीराम जिड्डेवार, रविनाश राठोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी