शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सहनिबंधकांचा कारभारच संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

राजेश डाबेराव हे अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ते निबंधक म्हणून कार्यरत असतात. पूर्वी जिल्हा उपनिबंधक हे बँकेचे रजिस्ट्रार होते. परंतु बैद्यनाथन कायद्यातील बदलानंतर विभागीय निबंधकांना जिल्हा बँकेचे रजिस्ट्रार बनविण्यात आले. यवतमाळ जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमधून नेहमीच ओरड ऐकायला मिळते.

ठळक मुद्देसहकार : जिल्हा बँक नोकरभरती, नव्या मजूर संस्थेला मंजुरीप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावर शासनाचे प्रतिनिधी म्हणून विभागीय सहनिबंधकांची देखरेख आहे. परंतु जिल्ह्याच्या सहकारातील एकूणच गैरप्रकार लक्षात घेता अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.राजेश डाबेराव हे अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ते निबंधक म्हणून कार्यरत असतात. पूर्वी जिल्हा उपनिबंधक हे बँकेचे रजिस्ट्रार होते. परंतु बैद्यनाथन कायद्यातील बदलानंतर विभागीय निबंधकांना जिल्हा बँकेचे रजिस्ट्रार बनविण्यात आले. यवतमाळ जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमधून नेहमीच ओरड ऐकायला मिळते. बँकेची नोकरभरतीही वांद्यात सापडली आहे. त्यातील गोंधळ पाहता बँकेवर रजिस्ट्रारचे नियंत्रण आहे की नाही, विभागीय सहनिबंधक पद खरोखरच अस्तित्वात आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. बँकेच्या कारभाराबाबत ग्रामीण भागातून तक्रारी वाढल्या आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती कायद्याच्या कचाट्यात सापडण्यामागे विभागीय सहनिबंधकांची संशयास्पद भूमिका कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. त्यांच्या अहवालावरूनच आरक्षण लागू करण्याचा मुद्दा गाजला. एकीकडे सहनिबंधक आरक्षण लागू नाही असे म्हणतात, तर दुसरीकडे आरक्षण भरले पाहिजे असा अहवाल देतात. त्यांच्याच अहवालावरून सहकार आयुक्तांनी न्यायालयात शपथपत्र दिले. या नोकरभरतीचे आता नेमके काय होणार, सुशिक्षित बेरोजगारांनी आणखी किती महिने प्रतीक्षा करावी आदी असा प्रश्न आहे.मजूर सहकारी संघाच्या प्रकरणातही विभागीय सहनिबंधक राजेश डाबेराव यांची भूमिका ठाम नव्हती. पूर्वी जिल्ह्यात एकच मजूर संघ होता. आता त्याचे दोन मजूर संघ झाले आहे. या मजूर संघालाही आधी स्थगनादेश दिला गेला व नंतर तो रद्द केला गेला. तो रद्द करताना त्याला कायदेशीर आधार नसल्याचे व नेमका कोणत्या कायद्याने रद्द केला गेला हे आदेशात नमूद नसल्याचे सांगितले गेले. एकूणच जिल्हा बँक, जिल्हा मजूर संघ प्रकरणात विभागीय सहनिबंधकांची मिळमिळीत भूमिका राहिली आहे. या प्रकरणात ‘उलाढाल’ही मोठी झाल्याचे सांगितले जाते. ही प्रकरणे गाजण्याचा ठपका सहनिबंधकांवरच ठेवला जात आहे.बँक संचालक मंडळाच्या बैठकीत तोडगा नाहीमंगळवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बँकेच्या नोकरभरतीचे पुढे काय याबाबत अनेक संचालकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र भरतीबाबत कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याचे सांगितले जाते. आरक्षण लागू करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे, बँकेनेही ते लागू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता नोकरभरतीबाबत आता नव्याने जाहिरात काढली जाणार का, संपूर्ण प्रक्रियाच नव्याने राबवावी लागणार का याबाबत संभ्रम आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :bankबँक