शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधी येतेय म्हणून सूरज धावला आणि समोर दिसला चिमुकल्या मानवीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करू, आरोपी येथेच आहे, असे सुनावले होते तेव्हा दीपाली दारात उभी राहून हे ऐकत होती. पोलीस अधीक्षक निघून गेल्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. याचा फायदा घेत दीपालीने दडवून ठेवलेला मानवीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो शेजारच्या स्वच्छतागृहाजवळ नेऊन ठेवला. मृतदेहाला पाणी सुटले होते तसेच गहूही चिकटला होता. त्यावर ड्रममधील पाणी टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : कुऱ्हा डुमणी येथील तीन वर्षीय चिमुरडी मानवीच्या खून प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरूच आहे. बुधवारी आरोपी दीपाली ऊर्फ पुष्पा हिला घटनास्थळी आणून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यास सांगण्यात आले. दीपालीने मानवीचा खून करून मृतदेह दडविला होता. मात्र, दुर्गंधी सुटू लागल्याने २७ डिसेंबरला रात्री ८.३० च्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होताच मृतदेह जवळच्या बाथरूमजवळ नेऊन ठेवला. त्यावेळी दुर्गंधी आणखीनच वाढली. शेजारीच राहात असलेला चुलत पुतण्या सूरज दुर्गंधीच्या दिशेने धावला. त्याचवेळी वीजपुरवठा सुरू झाला आणि समोर मानवीचा मृतदेह दिसल्याचे बुधवारी पोलिसांना सांगितले. गुन्हा उघडकीस येण्याच्या दिवशी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्याचवेळी पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करू, आरोपी येथेच आहे, असे सुनावले होते तेव्हा दीपाली दारात उभी राहून हे ऐकत होती. पोलीस अधीक्षक निघून गेल्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. याचा फायदा घेत दीपालीने दडवून ठेवलेला मानवीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो शेजारच्या स्वच्छतागृहाजवळ नेऊन ठेवला. मृतदेहाला पाणी सुटले होते तसेच गहूही चिकटला होता. त्यावर ड्रममधील पाणी टाकले. याचवेळी शेजारी राहात असलेल्या सूरजने दीपालीच्या नवऱ्याला काही तरी वास येत आहे, असे सांगितले. यावर दीपालीने घरातील फ्रीज उघडून दाखविला. याच दरम्यान सूरजचा शेजारी स्वप्निल धोटे हाही वास येत असल्याचे ओरडून सांगू लागला. ते ऐकून सूरज घराशेजारच्या बाथरूमकडे धावला. सूरज समोर पाहतो तर मानवीचा मृतदेह. हा प्रकार पाहून तो हक्काबक्का होऊन ओरडू लागला. त्याचवेळी वीजपुरवठा सुरू झाला आणि काही क्षणातच सूरजने मानवीचा मृतदेह पाहिल्याची वार्ता गावात पोहोचली. त्यानंतर पोलीस पाटील माला दत्तात्रय माकोडे यांनी पोलीस ठाणेदार पितांबर जाधव यांना याबाबतची माहिती दिली. पोलीस अधीक्षक पाटीलही घटनास्थळाकडे धावले आणि आरोपी दीपाली पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे यावेळी प्रात्यक्षिक करून पोलीस पथकासमोर दाखविण्यात आले. या गुन्ह्याच्या प्रात्यक्षिकावेळी ठाणेदार पितांबर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शिवराज पवार यांच्यासह दिनेश जाधव, मनोज चव्हाण, सचिन पिसे, संतोष गावंडे, सरपंच मनोज फेंडर, पोलीस पाटील माला दत्तात्रय माकोडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी