शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम टाके नसल्याने मैदानात ठेवली बाप्पांची मूर्ती, यवतमाळ नगरपरिषदेचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 19:39 IST

यवतमाळ - शहरातील गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र नगरपरिषदेने दहा दिवस उलटूनही कोणतीच ...

यवतमाळ - शहरातील गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनासाठी कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र नगरपरिषदेने दहा दिवस उलटूनही कोणतीच कार्यवाही केली नाही. अखेर पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी जागाच न मिळाल्याने एका भक्ताने चक्क बाप्पाला खुल्या मैदानात ठेवून दिले. यवतमाळ शहरातील प्रभाग ५ मध्ये येणा-या आदर्शनगरात घडला. नगरपरिषदेने शहरात ३० कृत्रिम टाके तयार करण्याचे नियोजन केले. दरवर्षीच कृत्रिम टाके व विहीर सफाईच्या नावाने निधी लाटला जातो. यावर्षीसुद्धा बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होवूनही कुठेच कृत्रिम टाके दिसत नाही. प्रभाग ५ मध्ये आदर्शनगरच्या खुल्या मैदानात आणि संजय गांधी शाळेत कृत्रिम टाके प्रस्तावित होते. या प्रभागातील सार्वजनिक विहिरींवर गणपती विसर्जनाला पूर्णत: बंदी आहे. तेथील पाण्याचा नागरिक पिण्यासाठी वापर करतात. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करायचे कुठे हा प्रश्न घेऊन अनेकजण प्रभागाच्या नगरसेवक वैशाली सवाई यांच्याकडे पोहोचले. त्यांनीसुद्धा कृत्रिम टाके नसल्याने असमर्थता दर्शविली. अखेर एकाने गणपती बाप्पाची मूर्ती खुल्या मैदानातच ठेवून दिली. या गंभीर प्रकारामुळे संताप निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासन कोणतेच काम वेळेत करताना दिसत नाही.गणपतीची स्थापना ही दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस अशा प्रकारे केली जाते. आपल्या मनोकामना पूर्ण करणा-या बाप्पाचे विसर्जन भक्त त्यांच्या सोयीने करतात. यामुळे गणपतीची स्थापना होण्यापूर्वीच नगरपरिषदेने कृत्रिम टाके व इतर विसर्जनाच्या सोयींचे नियोजन करणे अपेक्षित होते. भ्रष्ट कारभारामुळे केवळ कागदोपत्री काम करण्यात तरबेज असलेल्या यंत्रणेने ही समस्या निर्माण केल्याचा आरोप प्रभागाच्या नगरसेवक वैशाली सवाई यांनी केला आहे. यापूर्वीसुद्धा विसर्जनाबाबत तातडीने उपाययोजना कराव्या, अशी वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :YavatmalयवतमाळGanesh Mahotsavगणेशोत्सव