शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा उपविभाग सुरू; ; कर्मचार्‍यांची वानवा

By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST

अकोला जंगलांचे संवर्धन व्हावे व वनवृद्धी व्हावी, याकरिता वन विभागाच्यावतीने पांढरकवडा उपविभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, या विभागासाठी नवीन पदे निर्माण केली नसून, अकोला व नागपूर वनविभागातील कर्मचार्‍यांची येथे बदली करण्यात आली आहे.

अकोला : जंगलांचे संवर्धन व्हावे व वनवृद्धी व्हावी, याकरिता वन विभागाच्यावतीने पांढरकवडा उपविभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र, या विभागासाठी नवीन पदे निर्माण केली नसून, अकोला व नागपूर वनविभागातील कर्मचार्‍यांची येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच कमी कर्मचारी असलेल्या अकोला व नागपूर येथील कार्यालयात कर्मचार्‍यांची उणीव भासत आहे. अकोला व नागपूर विभागाचे विभाजन करून नवीन पांढरकवडा उपविभाग वन विभागाच्यावतीने सुरू करण्यात आला आहे. नागपूर विभागातील टिपेश्वर आणि अकोला विभागातील पैनगंगा ही दोन अभयारण्ये पांढरकवडा उपविभागाशी जोडण्यात आली आहेत. यासोबतच नागपूर व अकोला येथील कार्यालयातील कर्मचार्‍यांचीही बदली पांढरकवडा येथे करण्यात आली आहे. अकोला येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयातील मुख्य लिपिक १, स्टेनो १, चालक १, अकाऊंटंट १, लिपिक २ अशा सहा कर्मचार्‍यांची बदली पांढरकवडा येथे करण्यात आली आहे. अकोला कार्यालयातील सहा कर्मचार्‍यांची बदली करण्यात आल्यामुळे या कार्यालयात कर्मचार्‍यांची कमतरता भासत आहे. सध्या अकोला वन्यजीव विभागाकडे काटेपूर्णा व ज्ञानगंगा हे दोन अभयारण्य आहेत. या अभयारण्याच्या संवर्धन व विकासाची कामे अकोला कार्यालयातून चालतात. सध्या कर्मचारी कमी असल्यामुळे एकाच कर्मचार्‍याला अनेक कामे करावी लागत आहेत. त्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.