जिल्ह्यातील ५० हजार नागरिकांनी आतापर्यंत दिली कोरोनाला पटकनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:00 AM2021-05-06T05:00:00+5:302021-05-06T05:00:07+5:30

कोरोना संसर्गाचा दर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. १३.७ या दराने कोरोना फैलावत आहे. २४ तासात ९९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७ जणांचा मृत्यू झाला. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खासगी रुग्णालयात सात जण दगावले. जिल्ह्यात सात हजार १७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी दोन हजार ५८९ रुग्णालयात उपचार घेत आहे. तर गृहविलगीकरणात चार हजार ४२८ रुग्ण आहेत.

So far 50,000 citizens of the district have given Corona quickly | जिल्ह्यातील ५० हजार नागरिकांनी आतापर्यंत दिली कोरोनाला पटकनी

जिल्ह्यातील ५० हजार नागरिकांनी आतापर्यंत दिली कोरोनाला पटकनी

Next
ठळक मुद्दे५८ हजार रुग्णांची नोंद : मंगळवारी १२३९ पॉझिटिव्ह तर २६ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात वर्षभरात ५० हजार २९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. बुधवारपर्यंत ५८ हजार ७१५ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा ८८.६६ इतका आहे. आरोग्य विभागाने बुधवारी सात हजार ३०० नमुन्यांची तपासणी केली. यामध्ये एक हजार २४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 
कोरोना संसर्गाचा दर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. १३.७ या दराने कोरोना फैलावत आहे. २४ तासात ९९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७ जणांचा मृत्यू झाला. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खासगी रुग्णालयात सात जण दगावले. जिल्ह्यात सात हजार १७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी दोन हजार ५८९ रुग्णालयात उपचार घेत आहे. तर गृहविलगीकरणात चार हजार ४२८ रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एक हजार ३९९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सध्याचा मृत्यूदर २.३८ इतका आहे. पॉझिटिव्ह आलेल्या १२३९ जणांमध्ये ७४५ पुरुष आणि ४९४ महिला आहेत. यवतमाळातील सर्वाधिक २०७ रुग्ण, दिग्रस येथील २००, वणी १९३, पांढरकवडा १४७, दारव्हा ७३, मारेगाव ६५, नेर ६४, पुसद ६४, उमरखेड ४८, महागाव ४५, घाटंजी ४२, कळंब ३९, आर्णी १९, झरीजामणी १४, बाभूळगाव ७, राळेगाव ६ आणि इतर शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत चार लाख ४९ हजार ७६ नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यापैकी चार लाख ४५ हजार ६४१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहे. त्यामध्ये ३ लाख ८६ हजार ९२६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तीन हजार ४३५ नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. 
यवतमाळ, दिग्रस, वणी, पांढरकवडा या तालुक्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोविड अवेअरनेस अभियान राबविले जात आहे. त्याकरिता गाव स्तरावरच्या कोरोना सनियंत्रण समित्यांना पुन्हा कामाला लावण्यात आले आहे. लोकसहभागही यासाठी घेतला जाणार आहे. लसीकरण व चाचण्यांवर भर आहे. 

बेडची उपलब्धता
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ दोन बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील २८ खासगी कोविड रुग्णालयात एकूण १ हजार ४४ बेड आहेत. यापैकी ३४३ बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ३६० बेडपैकी १६९ बेड शिल्लक आहेत. ३४ कोविड केअर सेंटरमध्ये दोन हजार ७२३ बेडपैकी १ हजार ४७८ बेड शिल्लक आहेत. 

१८ ते ४४ वयोगटातील १८५० जणांना लस 
 जिल्ह्यात १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. मंगळवारपर्यंत १ हजार ८५० जणांना लस देण्यात आली आहे. यात यवतमाळ शहरातील पाटीपुरा केंद्रावर ३७५, लोहारा केंद्रावर ३५७, पुसद उपजिल्हा रुग्णालयात ३६७, दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात ३७५, पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात ३७६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

Web Title: So far 50,000 citizens of the district have given Corona quickly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.