शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात सरकारी केंद्रावर कापूस, तूर खरेदी संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे६६०७ शेतकऱ्यांनी केली ऑनलाईन नोंदणी, हंगामाचा खर्च भागविण्याची शेतकऱ्यांना लागली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर कापूस आणि तुरीची खरेदी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना विक्रीला आधीच विलंब होत आहे. त्यात बँक खात्यात पैसे जमा व्हायला वेळ लागतो. यामुळे हंगामाचा खर्च कसा भागवावा, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कापूस, तर साडेतीन हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. परंतु त्यामधील कापसाकरिता दररोज केवळ २०, तर तुरीकरिता केवळ १00 जणांचा क्रमांक लागतो. त्यातही एक लाख क्विंटल कापसाची खरेदी होणार असल्याची चर्चा आहे. जागेअभावी तूर खरेदी काही दिवसांकरिता बंद झाली. त्यामुळे संपूर्ण मालाची खरेदी होईल की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. येथे केवळ एकाच सेंटरवर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात झाली. त्यातही आवक वाढल्याचे कारण पुढे करुन मध्येच खरेदी बंद झाली. ब्रेकनंतर खरेदी सुरु झाली.तीन ३ हजार १०७ शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली. आता दररोज केवळ २० कापूस गाड्यांचे मोजमाप होते. परंतु नोंदणी केलेल्यांची संख्या मोठी आहे. हीच गती राहिली तर पाच महिन्यातही खरेदी आटोपणार नाही. नाफेडतर्फे दारव्हा विविध कार्यकारी सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदीचीसुद्धा तीच अवस्था आहे. साडेतीन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी झाली. एक हजार ८५८ शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन न होऊ शकल्याने पेंडींग आहे. दररोज चार ते पाच गाड्यांचे मोजमाप होते. सध्या जागेअभावी खरेदी बंद करण्यात आली. याप्रकारे शेतमालाची खरेदी होत असताना इकडे खरीप हंगाम तोंडावर आला. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात होईल. त्यामुळे आत्तापासूनच शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागेल आहे. अशावेळी त्वरित मालाची विक्री होऊन हातात पैसे न पडल्यास शेतीचा खर्च कोठून लावावा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कापसाच्या दिवसाला किमान १00 गाड्या सोडल्या जाव्या, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमोल राठोड, वहीद खान, प्रकाश उरकुडे आदींसह शेतकºयांनी केली आहे.सीमाबंदीचा फटकासंचारबंदीतून शेतमालाच्या खरेदी-विक्रीला सूट देण्यात आली. मात्र बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतमालाचे लिलाव होत नाही. तसेच चांगली बाजारपेठ नाही. त्यामुळे शेतकरी शेतमाल शेजारच्या कारंजा येथे घेऊन जातात. मात्र सध्या जिल्हा बंदीमुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी कारंजा येथे राहतात. त्यांची शेती येथे आहे. त्यांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. काहींची शेतजमीन मानोरा तालुक्यात येते. त्यांनाही शेतात जाता येत नाही. या शेतकऱ्यांना परवानगी मिळायला हवी, अशी अपेक्षा रामगावचे सुभाष साबु, चोरखोपडीचे माणिकचंद कांकरिया, दारव्हाचे सतीश गावंडे आदींनी व्यक्त केली.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड