शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

४०० वर परिपक्व सागवानांची कत्तल

By admin | Updated: October 6, 2014 23:19 IST

राखीव वनातील चारशेवर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून कोट्यवधी रूपयांचा लाकूडसाठा तस्करांनी लंपास केला. हा गंभीर प्रकार जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमध्ये उघडकीस आला.

यवतमाळ : राखीव वनातील चारशेवर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून कोट्यवधी रूपयांचा लाकूडसाठा तस्करांनी लंपास केला. हा गंभीर प्रकार जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमध्ये उघडकीस आला. मात्र कारवाईच्या भीतीपायी वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेची वाच्यता न करता सारवासारव चालविली असल्याची माहिती आहे.जोडमोहा वनपरिक्षेत्रातील मार्तंडा बिटमधील राखीव वनातील कक्ष क्र. २१२ हे घाटंजी आणि नवनिर्मित वडगाव (जंगल) या दोन वनपरिक्षेत्रांच्या सीमेवर आहे. हद्दीच्या वादातून संबंधित तीनही वनपरिक्षेत्रांनी या राखीव वनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. नेमक्या याच बाबीचा फायदा घेत दुर्गम भागात असलेल्या या जंगलातील तब्बल चारशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. तसेच वाहनाद्वारे टप्प्याटप्प्याने कोट्यावधी रूपयांचा लाकूडसाठा लंपास केला. हा लाकूडसाठा आंध्र प्रदेशात तस्करी झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. असे असताना जोडमोहाच नव्हे तर घाटंजी आणि वडगाव (जंगल) वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचारी या गंभीर प्रकारापासून अनभिज्ञ असल्याचे दर्शवितात. चारशेवर सागवान वृक्षांची कत्तल करून त्याची तस्करी करणे, हे काही एक दोन दिवसाचे काम नाही. सुमारे महिनाभर मार्तंडा येथील जंगलात परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल केली गेली असावी असा, अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात जोडमोहा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांना कुठलीच माहिती नसल्याचे सांगण्यात. त्यानंतर मात्र चौकशीत कत्तल आणि तस्करीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतरही हद्दीचा वाद करून नेमके जंगल कुणाचे याची पडताळणी करण्यात आली. मात्र अद्यापही कारवाईच्या भीतीने या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना देण्यात आली नसल्याचे खुद्द वन विभागातूनच सांगण्यात आले. विशेष असे की, या बिटच्या संरक्षणाची जबाबदारी असलेला वनरक्षक अपंग आहे. तरी त्याला दुर्गम भागात नेमण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)