कोविड सेंटरमध्ये सहा जण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:24+5:30

गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महावीर भवनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सुचना केल्या. वृत्त लिहेपर्यंत ही बैठक सुरूच होती. वणी शहरात लागोपाठ सहा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आतापर्यंत बिनधास्त असलेले वणी शहर काही प्रमाणात सजग झाले आहे.

Six quarantine at the Covid Center | कोविड सेंटरमध्ये सहा जण क्वारंटाईन

कोविड सेंटरमध्ये सहा जण क्वारंटाईन

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क : वणीतील प्रतिबंध क्षेत्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : नव्याने डिटेक्ट झालेल्या सहाव्या कोरोनाबाधित रूग्णाच्या थेट संपर्कातील सहा जणांना बुधवारी रात्री उशिरा परसोडा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, गुरूवारी सकाळी १५ जणांचा अहवाल प्राप्त झाला. हे सर्वजण निगेटीव्ह असल्याने प्रशासनाने तुर्तास सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. चार जणांचा अहवाल अद्याप अप्राप्त असून तोही लवकरच प्राप्त होईल, असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता एकूण १० रिपोर्टची प्रतीक्षा वणीकरांना आहे. गुरूवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महावीर भवनमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तेथे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक त्या सुचना केल्या. वृत्त लिहेपर्यंत ही बैठक सुरूच होती. वणी शहरात लागोपाठ सहा कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने आतापर्यंत बिनधास्त असलेले वणी शहर काही प्रमाणात सजग झाले आहे. असे असले तरी शहरात होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत आहे.

कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधांचा अभाव
संशयित रूग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथील शासकीय वसतिगृह ताब्यात घेऊन तेथे कोव्हिड सेंटर उभारले. परंतु याठिकाणी सोयीसुविधांचा प्रचंड अभाव असल्याची ओरड क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांकडून केली जात आहे. येथील शौचालयाची अतिशय दुरावस्था असून पिण्याच्या पाण्याचीदेखिल व्यवस्था नसल्याची ओरड क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांकडून केली जात आहे. याठिकाणी विजेची समस्याही असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Six quarantine at the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.