शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

घरीच बसा, मोबाईल उघडा अन् पेपर सोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

आता पहिली ते नवव्या वर्गाच्या परीक्षा चक्क मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शहरातील काही शाळांनी त्याबाबत पालकांना सूचनाही दिल्या आहे. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. मात्र आता पोरांना परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज नाही. त्याऐवजी पेपरच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन लिंकद्वारे पाठविला जाणार आहे.

ठळक मुद्देचिमुकल्यांसाठी इंग्रजी शाळांची शक्कल : कोरोनाला हुलकावणी देत परीक्षा घेणार ऑनलाईन

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरीच अभ्यास करा अन् घरीच परीक्षाही द्या... बाबाचा मोबाईल घ्या... त्यावर पेपर सोडवा अन् पास व्हा!कोरोनाच्या धास्तीने शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या मिळाल्या. त्याचा पोरांना आनंद झालाच. मात्र या अचानक घडलेल्या बदलाने परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू असल्या तरी पहिली ते नववीच्या परीक्षांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर शहरातील इंग्रजी शाळांनी मात्र आधुनिक काळाला साजेशी शक्कल शोधून काढली आहे.आता पहिली ते नवव्या वर्गाच्या परीक्षा चक्क मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शहरातील काही शाळांनी त्याबाबत पालकांना सूचनाही दिल्या आहे. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. मात्र आता पोरांना परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज नाही. त्याऐवजी पेपरच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन लिंकद्वारे पाठविला जाणार आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर वस्तूनिष्ठ पद्धतीचा पेपर उघडला जाईल. त्यावर ४० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळातच ही परीक्षा होणार असल्याची माहिती शाळेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.तर वायपीएस शाळेत पहिली ते सहावीचे सर्व पेपर आधीच आटोपले असून सातवी ते नववीचा केवळ एक पेपर शिल्लक आहे. त्याचे अ‍ॅग्रीगेट मार्क दिले जातील, अशी माहिती प्राचार्य डॉ.जेकब दास यांनी दिली. सेंट अलॉईसेस शाळेने खालच्या वर्गांच्या परीक्षा आधीच आटोपून घेतल्या आहे. फ्री मेथॉडिस्ट शाळेच्या परीक्षा २७ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र आता सुरुवातीच्या दोन-तीन पेपर स्थगित करून १ एप्रिलपासून उर्वरित पेपर घेतले जाणार असल्याची माहिती प्राचार्य खत्री यांनी दिली. तर एसओएसचे प्राचार्य नरेंद्रसिंह चव्हाण म्हणाले, ३१ मार्चनंतर आमच्या शाळेत परीक्षेचे नवे वेळापत्रक दिले जाणार आहे.पूर्वानुभव लक्षात घेऊन लावणार रिझल्टपोदार शाळेने नवीच शक्कल शोधली आहे. तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वर्षभरात आतापर्यंत तीन वेळा परीक्षा झाली. या इंटर्नल असेसमेंटमधील विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन त्याचा वार्षिक निकाल दिला जाणार आहे, अशी माहिती प्राचार्य प्रफुल्ल चपाटे यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा