शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्र परिसरात शांतता, कक्षातही पीन ड्राॅप सायलेन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांच्या सभोवताल कॉप्या पुरविणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. भिंतीवर चढून, खिडकीमधून काॅप्या पुरविण्यासाठी त्यांची धडपड राहते. काही जण तर जीवावर उदार होऊन हा प्रकार करतात. यावेळेस मात्र अतिशय वेगळे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. काही ठिकाणी यासाठी चाचपणी करण्यात आली. परंतु कुठल्याही केंद्राबाहेर काॅपी पुरविणारे दिसत नव्हते. सर्वत्र निरव शांतता होती.

किशोर वंजारीलोकमत न्यूज नेटवर्क नेर : दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांच्या सभोवताल कॉप्या पुरविणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. भिंतीवर चढून, खिडकीमधून काॅप्या पुरविण्यासाठी त्यांची धडपड राहते. काही जण तर जीवावर उदार होऊन हा प्रकार करतात. यावेळेस मात्र अतिशय वेगळे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. काही ठिकाणी यासाठी चाचपणी करण्यात आली. परंतु कुठल्याही केंद्राबाहेर काॅपी पुरविणारे दिसत नव्हते. सर्वत्र निरव शांतता होती. पोलिसांचे काॅपी पुरविणाऱ्यांमागे धावणे, परीक्षा केंद्रांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांकडून रागावणे, अशी परिस्थिती दिसली नाही. परीक्षा कक्षातही विद्यार्थी अतिशय शांतपणे पेपर सोडवित होते. भरारी पथकाच्या दराऱ्यामुळे ही परिस्थिती होती, असा दावा शिक्षकांकडून केला जात होता.

नेरमध्ये दहावीचे १४६६ विद्यार्थी देताहेत परीक्षा- नेर तालुक्यात दहाव्या वर्गाचे १४६६ विद्यार्थी विविध केंद्रांवर परीक्षा देत आहेत.- प्रत्येक विद्यार्थी ‘पास’ होईल असा दावा केला जात आहे. या मागचे कारण मात्र त्यांनाच माहिती.

बारावीच्या परीक्षाही शांततेतच सुरू- नेर तालुक्यात बाराव्या वर्गाचे १४९१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.- आतापर्यंत झालेले सर्व विषयांचे पेपर चांगले गेल्याचे विद्यार्थी पूर्ण विश्वासाने सांगत आहेत.

गुरुजीच परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीला धावल्याची चर्चा

- प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिलेल्या परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविणाऱ्यांची झुंबड नव्हती. मात्र, काही ठिकाणी गुरुजीच मदतीला धावल्याची चर्चा होती.

- विद्यार्थी सर्व सोयीनिशी परीक्षा देण्यासाठी आल्याची चर्चा होती. तरीही पथकांना काॅपी सापडली नाही, याविषयी आश्चर्यच आहे.

काॅपीविरहित परीक्षाभरारी पथकाने काही परीक्षा केंद्रांवर धाडी टाकल्या. परंतु कुठल्याही केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना आढळले नाही. रनर, ग्रामसेवक, पटवारी, बैठे पथक यामुळे काॅपी विरहित परीक्षा पार पडत आहे.- मंगेश देशपांडे, गटशिक्षणाधिकारी, नेर

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाssc examदहावी