शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख-निलोफर हत्येने शैक्षणिक वर्तुळ हादरले

By admin | Updated: September 11, 2014 23:50 IST

दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी. अभ्यासात अत्यंत हुशार. सर्वांशी मिळवून मिसळून राहणारे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून भविष्याचे स्वप्न रंगविणारे. मात्र या स्वप्नाला कुणाची तरी दृष्ट लागली.

माहूरची घटना : रहस्य कायम, मारेकऱ्यांचा थांगपत्ता नाही अशोक काकडे/अविनाश खंदारे - पुसद/उमरखेड दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी. अभ्यासात अत्यंत हुशार. सर्वांशी मिळवून मिसळून राहणारे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून भविष्याचे स्वप्न रंगविणारे. मात्र या स्वप्नाला कुणाची तरी दृष्ट लागली. माहूरच्या निर्मुनष्य रामगड किल्ल्यात दोघांचेही गळा चिरुन आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. गुरुवारी उघडकीस आलेल्या शाहरुख आणि निलोफरच्या हत्याकांडाने जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळासह संपूर्ण समाजमन हादरले. माहूर येथील ऐतिहासिक रामगड किल्ल्याच्या बारुदखाण्याजवळ गुरुवारी सकाळी शाहरुख आणि निलोफरचा मृतदेह आढळून आला. या दोघांचीही हत्या धारदार शस्त्राने गळा चिरुन आणि दगडाने ठेचून करण्यात आली होती. हे दोघेही बुधवारी इंडिक व्हिस्टा कारने माहूर येथे आले होते. त्यानंतर रामगड किल्ल्यावर गेले. परंतु गुरुवारी सकाळी त्यांचे मृतदेहच आढळून आले. निलोफर मारिया खालीद बेग मिर्झा ही पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. शिक्षणात अत्यंत हुशार आणि महाविद्यालयात सर्वांशी एकोप्याने राहणारी होती. बुधवारी नेहमीप्रमाणे ती महाविद्यालयात गेली. सायंकाळी ५.३० पर्यंत नेहमी प्रमाणे घरी येणारी निलोफर घरीच आली नाही. तिचा मोबाईल लावला असता तो स्वीच आॅफ येत होता. घरात एकुलती एक मुलगी असलेली निलोफर घरी न आल्याने पालक चिंताग्रस्त झाले. तिचा शोध सुरू केला. परंतु कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. वडिलांनी रात्रीच पुसद शहर पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेतले असता रात्री १ वाजताच्या सुमारास तिचे लोकेशन माहूरच्या रामगड किल्ल्यावर आढळून आले आणि तेथून शोधाशोध सुरू झाली. तो गुरुवारी सकाळी तिचा एका तरुणासोबत मृतदेहच आढळून आला. शाहरुख पठाण हा उमरखेड शहरातील व्यावसायिक फिरोज पठाण यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने युनिर्व्हसल इंग्लिश मीडियम स्कूलमधून दहावीची परीक्षा ७० टक्के गुणाने उत्तीर्ण केली. त्यानंतर पुसदच्या डॉ.एन.पी. हिराणी तंत्रनिकेतनमधून मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका घेतली. दोन दिवसापूर्वीच त्याने यवतमाळच्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेत द्वितीय वर्षात प्रवेश घेतला होता. अतिशय शांत स्वभावाचा म्हणून तो मित्र परिवारात परिचित होतो. महाविद्यालयात गरीब मित्रांना तो शैक्षणिक शुल्क आणि मेससाठी सतत पैशाची मदतही करीत होता. त्याच्या या स्वभावामुळेच तो सर्वांचा प्रिय होता. यवतमाळात प्रवेश घेतला असला तरी त्याचे शिक्षण पुसदला झाल्याने तो बुधवारी पुसद येथे गेला. गरीबांच्या शिक्षणासाठी शाहरुखची होती धडपडउमरखेड शहरातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाहरुखची नेहमी धडपड असायची. त्याने रहीमनगर, नागापूर (रुपाळा) या भागातील पहिली ते पाचवीच्या ५० मुलांना शिकविण्यासाठी खासगी शिक्षक ठेवला होता. या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च तो करीत होता. तसेच अभियांत्रिकी शिक्षण घेतानाही तो गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरायचा. एवढेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना मेसच्या जेवणासाठीही दरमहा पैसे देत होता. शिक्षणावर मनापासून प्रेम करणारा शाहरुखची हत्या झाल्याने प्रत्येक जण हळहळत होता.