शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

फळ व्यापाऱ्याकडे सात लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:53 IST

शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहे. रविवारी रात्री ९ वाजता पांढरकवडा रोडवरील गुलशननगर येथील फळ व्यापाºयाचे घर चोरट्यांनी फोडले. ते कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला.

ठळक मुद्देगुलशननगर : साडेपाच लाखांची रोकड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहे. रविवारी रात्री ९ वाजता पांढरकवडा रोडवरील गुलशननगर येथील फळ व्यापाºयाचे घर चोरट्यांनी फोडले. ते कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. तब्बल पाच लाख ४७ हजारांची रोख आणि दीड लाख रुपये किमतीचे सोने चोरी गेले.मोहंमद हफीज मोहंमद साहब रा. गुलशननगर पांढरकवडा रोड यांच्याकडे अज्ञात चोरट्याने चोरी केली. हफीज यांचा फळांचा व्यापार आहे. फळांच्या व्यापारातून मिळालेली रक्कम त्यांनी घरीच दिवाणमध्ये लोखंडी पेटीत ठेवली होती. रविवारी ते कुटुंबासह मेराज लॉन येथे साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले होते. तर हफीज यांचा मोठा मुलगा मोहंमद कासीफ हा मित्रांसोबत फिरायला गेला होता. नंतर तो घरी परत आला. तेव्हा त्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने चोरी झाल्याची माहिती वडील मो. हफीज यांना दिली. घरात येऊन बघितले असता सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. कपाटाला चाबी लागलेली होती. त्यामुळे चोरट्याला कोणतेचे प्रयत्न करावे लागले नाही. त्याने ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढले. तर दिवाणमध्ये असलेल्या लोखंडी पेटीतील पाच लाख ५७ हजार रुपये लंपास केले.ही घटना रविवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान घडली. अतिशय वर्दळीचा परिसर म्हणून गुलशननगर ओळखल्या जातो. घराचे कुलूप तोडताना आवाज झाला असता, मात्र तोही पहिल्या मजल्यावर राहणाºया भाडेकरूंना ऐकायला आला नाही. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांच्या तपासाची दिशा सध्या तरी स्थानिकांवरच केंद्रित आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वान त्याच परिसरात घुटमळले. शिवाय चोरीच्या ठिकाणावरून ठसे तज्ज्ञांनी काही नमुने गोळा केले आहे. सायबर सेलच्या टीमनेही घटनास्थळावर पाहणी केली. अद्याप पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित नसली तरी हा गुन्हा नक्कीच उघडकीस येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.मोठी रक्कम गेल्याची चर्चाया घरफोडीमध्ये रेकॉर्डवर सात लाख रुपये चोरी गेल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र मोठी रक्कम गेल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे. कायम वर्दळ असलेल्या गुलशननगरात आजपर्यंत भंगारही चोरीला गेले नाही. अशात सात लाखांची घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे.

टॅग्स :Thiefचोर