जीव विकणे आहे! : जगणे ही सर्वसामान्य माणसाची इच्छा असते, तर जगवणे हा शेतकऱ्यांचा ‘जज्बा’! पण दुष्काळाच्या कराल दाढेत पोशिंदाही मृत्यूसमीप पोहोचला. स्वत: जगणे कठीण त्यात बैलजोडी कशी पोसावी, हा प्रश्न त्याचे काळीज कुरतडतो. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून ओस पडलेल्या आर्णीच्या बैलबाजारात या गुरुवारी मात्र बैलजोड्यांची तुफान गर्दी झाली होती. दुष्काळामुळे विक्रेते भरपूर पण खरेदीदारच नाही, अशी परिस्थिती आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}