‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

By Admin | Updated: June 1, 2016 00:08 IST2016-06-01T00:08:07+5:302016-06-01T00:08:07+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी अतुल पांडे याची टेस्टी बाईट ईटेबल्स प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

Selected in JDIET's student nominated company | ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी अतुल पांडे याची टेस्टी बाईट ईटेबल्स प्रा.लि. पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या इन कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील पात्र विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सर्वप्रथम आॅनलाईन अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यातून अतुल पांडे याची निवड झाली आहे. कंपनीतर्फे या विद्यार्थ्याला ग्रॅज्यूएट इंजिनिअर ट्रेनी या पदावर कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात रुजू करून घेतले जाणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Selected in JDIET's student nominated company