शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात १६ गावांमधील शेताच्या बांधावर पोहोचले बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी कृषी सेवा केंद्रातून केल्यास गर्दी होऊ शकते. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे, खत पुरवठा थेट बांधावर केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा । तीन आमदारांच्या उपस्थितीत खताची २१ वाहने रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर खते, बियाणे पुरविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. तीन आमदारांच्या उपस्थितीत बुधवारी १६ गावांत बियाणे व खते रवाना करण्यात आले.बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी कृषी सेवा केंद्रातून केल्यास गर्दी होऊ शकते. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे, खत पुरवठा थेट बांधावर केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार इंद्रनील नाईक, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.पी.जी. नाईक, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड उपस्थिती होते.शेतकरी गटामार्फत भाजीपाला व फळे यांचा १४ क्ंिवटल पुरवठा शहरामध्ये करण्यात आला. त्याच धर्तीवर गावपातळीवर बियाणे, खते पुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आत्माअंतर्गत नोंदणीकृती गटाकडे किंवा तात्पुरता गट स्थापन करून त्यांची नावे, पत्ता, सर्व्हे नंबर, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषी केंद्रामार्फत निविष्ठा खरेदी करावयाच्या आहे, त्याचे नाव, आवश्यक निविष्ठांची नोंदणी कृषी विभागाद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर करता येणार आहे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने गटप्रमुखानेच निविष्ठांची उचल करावी. यामुळे सर्व शेतकऱ्यांना कृषी केंद्रात जावे लागणार नाही. एकत्रित खरेदीमुळे माल वाहतूक व हमालीचा खर्च वाचणार आहे.१.२० टन बियाणे ५० मेट्रीक टन खतलोकप्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्या दिवशी २१ वाहनांनी तालुक्यातील १६ गावात १.२० टन बियाणे आणि ५० मेट्रीक टन खत रवाना करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी बी.डी. चेके, नीलेश राठोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.डी. मारे यांनी नियोजनाविषयक कामे पार पाडली. कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे अध्यक्ष सुधीर पळसकर, सचिव नितेश शेजपाळ, कोषाध्यक्ष प्रविर व्यवहारे यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी