शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओविरुद्ध सरपंचांचा एल्गार

By admin | Updated: June 2, 2017 01:48 IST

गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंचांनी एल्गार पुकारला

बदलीची मागणी : उमरखेड तालुक्यातील शेकडो सरपंचांचे सीईओंना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गटविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंचांनी एल्गार पुकारला असून गटविकास अधिकाऱ्यांची बदली करावी, या मागणीसाठी शेकडो सरपंचांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गटविकास अधिकाऱ्याच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. उमरखेड येथे गटविकास अधिकारी म्हणून जयश्री वाघमारे कार्यरत आहेत. त्या उमरखेड येथे रुजू झाल्यापासून विकास कामे ठप्प झाल्याचा सरपंचांचा आरोप आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातही त्या सहकार्य करीत नाही. उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील नागरिक गटविकास अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येतात. परंतु त्या उपस्थित राहात नाही. कार्यालयीन प्रशासकीय कामे खोळंबली असून विकास कामांना खीळ बसली आहे. याबाबत त्यांना सांगूनही उपयोग होत नाही. अशा गटविकास अधिकाऱ्याची बदली करून नवीन गटविकास अधिकारी नियुक्त करावा अन्यथा उपोषणाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस यांच्यामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे.निवेदनावर पंचायत समितीच्या उपसभापती विशाखा जाधव, दिंडाळाचे सरपंच भाऊराव जाधव, बोथाच्या सुनीता राठोड, टाकळी इजाराच्या अहिल्या लांबटिळे, परजनाचे गौतम दवने, झाडगावच्या जयश्री जोगदंडे, चिखलीच्या कामिना जाधव, बिटरगाव बु.च्या बेबीताई कौरवाड, हरदडाचे रवीचंद्र दवने, भवानीच्या कविता राठोड, वरुडच्या जनाबाई राठोड, धनजच्या महानंदा डोंगरे, पोफाळीचे नरेंद्र बरडे, चुरमुराच्या ललिता जाधव, देवसरीचे गजानन देवसरकर, अंबाळीचे प्रल्हाद जाधव, पिंपळगावच्या यशोदाबाई राठोड, चातारीचे भगवान माने यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच व उपसरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.पैसे काढण्याची परवानगी रद्द कराग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या कामांचे मूल्यांकन करण्यात येते. त्यानंतर बँकेमधून पैसे काढण्याची परवानगी गटविकास अधिकाऱ्याकडून घ्यावी लागते. त्यामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गटविकास अधिकाऱ्यांची पैसे काढण्यासाठी परवानगीची अट रद्द करावी, अशी मागणी सरपंच व उपसरपंचांनी केली आहे.