शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सलून व्यावसायिकांची कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

विशेष बाब म्हणून नाभिक कुटुंबाच्या बँक खात्यात तीन महिन्यांचे ३० हजार रुपये जमा करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास मान्सूनच्या पहिल्या पुरात जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाव्यापी या आंदोलनाची सुरुवात येथील संतसेना चौकातून केली जाईल, असे या निवेदनात नमूद केले आहे.

ठळक मुद्दे८ जूनचा अल्टीमेटम : आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अडचणीत आलेले सलून व्यावसायिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांनी प्रशासनाला ८ जूनचा अल्टीमेटम दिला आहे. जिल्ह्यातील सलून दुकाने, सलून पार्लर उघडण्याची परवानगी तत्काळ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सलून व्यवसाय बंद आहे. मध्यंतरी नऊ दिवस त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र पुन्हा बंदचा आदेश काढण्यात आला. दुकाने बंद असल्यामुळे सलूनचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शिवाय दुकान किरायाचे असल्याने भाडे थकीत झाले. वीज बिलाचा भरणाही करण्यात आला नाही. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सलूनची दुकाने सुरू करण्यासंदर्भात ८ जूनपर्यंत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष बाब म्हणून नाभिक कुटुंबाच्या बँक खात्यात तीन महिन्यांचे ३० हजार रुपये जमा करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यासंदर्भात निर्णय न झाल्यास मान्सूनच्या पहिल्या पुरात जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाव्यापी या आंदोलनाची सुरुवात येथील संतसेना चौकातून केली जाईल, असे या निवेदनात नमूद केले आहे. जिल्हा सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मादेशवार आदींच्या स्वाक्षऱ्यांनिशी निवेदन देण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या