शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजस्व अभियान मंदावले

By admin | Updated: August 4, 2014 23:59 IST

जनतेच्या सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभी या अभियानाने चांगलीच गती पकडली होती़ मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून महसूल विभागाने

सेतू केंद्रात अर्जाचे ढिगारे : विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रांसाठी धावपळवणी : जनतेच्या सुविधेसाठी महाराष्ट्र शासनाने सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरू केले़ अभियानाच्या प्रारंभी या अभियानाने चांगलीच गती पकडली होती़ मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून महसूल विभागाने या लोक कल्याणकारी अभियानाकडे कानाडोळा करणे सुरू केल्याने त्याची गती मंदावली आहे़ ऐन प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी धावपळ सुरू असून विद्यार्थ्यांच्या अर्जांचे सेतू केंद्रात ढिगारे गोळा होत आहे़ परिणामी विद्यार्थ्यांना आवश्यक तेव्हा प्रमाणपत्र मिळणे अशक्य होत आहे़राज्यातील जनतेला महसूल विभागातील कामे करणे सुलभ जावे, म्हणून राज्य शासनाने चार वर्षांपूर्वी सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरू केले़ या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी किंवा शाळेतच आवश्यक प्रमाणपत्रांचे वाटप करणे, सात-बाराचे चावडी वाचन करून शेतकऱ्यांना जागेवरच सातबारा दुरूस्त करुण देणे, गावातील पांदण रस्त्यांचे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे, यांच्यासह अनेक कामे जनतेच्या दारात जाऊन करण्याचे निर्देश कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. प्रथम दोन वर्ष महसूल विभागाने अभियानाचा धुमधडाका सुरू ठेवला होता. मात्र मागील दोन वर्षांपासून या राजस्व अभियानाची गती चांगली मंदावली आहे़ आता तर हे अभियान नावापुरतेच शिल्लक राहिले आहे़ विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी विविध प्रमाणपत्रे व उत्पन्नाचे दाखले आवश्यक आहे़ ते जर त्यांना शाळेतच मिळण्याची व्यवस्था राजस्व अभियानाअंतर्गत गावोगावी करण्यात आली असीत, तर सेतू केंद्रावरील मोठा भार कमी झाला असतात. मात्र तसे होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्रासमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अर्ज दिल्यानंतर पावतीवर प्रमाणपत्रे मिळण्याची संभाव्य तारीख दिली जाते़ परंतु दिलेली तारीख उलटून गेल्यानंतरही कित्येक दिवस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतच नाही, हे येथील वास्तव आहे़ वास्तविकता दिलेल्या मुदतीत प्रमाणपत्र न दिल्यास त्यांना आकारलेल्या सुविधा आकाराची रक्कम परत करावी लागते, असे शासनाचे परिपत्रक आहे़ मात्र त्याला महसूल अधिकारी व कर्मचारी जुमानतच नाहीत़ त्यामुळे जनतेचे प्रचंड हाल होत आहे़ फेरफार अदालती घेतल्या जात नाही़ घेतल्याच तर त्या केवळ नामधारी घेतल्या जातात़ काही गावांतील पांदण रस्ते अतिक्रमणाने बंद झाले. त्याची गावकऱ्यांकडून तक्रार येऊनही महसूल विभाग दखल घेत नाही, ही शोकांतिका आहे़ त्यामुळे हे अभियान काय कामाचे, असा प्रश्न विचारला जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)