शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीकारांना माती पुरविण्यात महसूलचे अडेलतट्टू धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:44 IST

पर्यावरणासाठी घातक असलेले प्लॅस्टर आॅफ पॅरिस मूर्तीकारांनी टाळावे, असे आवाहन एकीकडे केले जात आहे...

ठळक मुद्देदुजाभाव : कुंभार बांधवांमध्ये तीव्र नाराजी, २३ आॅगस्टला बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पर्यावरणासाठी घातक असलेले प्लॅस्टर आॅफ पॅरिस मूर्तीकारांनी टाळावे, असे आवाहन एकीकडे केले जात आहे. मात्र दुसरीकडे मूर्तीकारांना माती उपलब्ध करून देण्यात महसूल विभाग अडेलतट्टू धोरण राबवित आहे. या प्रकारात कुंभार बांधवांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.कुंभार बांधव आणि मूर्तीकारांना मूर्ती तयार करण्यासाठी यापूर्वी लाल माती उपलब्ध करून दिली जात होती. २०१२ ते २०१६ पर्यंत यासाठी कुठलेही अडथळे आणले गेले नाही. २०१६ मध्ये पालकमंत्री मदन येरावार यांनी बैठक घेऊन माती उपलब्ध करून दिली. यावेळी मात्र महसूल प्रशासनाने यामध्ये आडकाठी आणली आहे. मूर्ती तयार करण्यासाठीची माती उपलब्ध करून देण्यात तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडून विरोध होत असल्याचा आरोप मूर्तीकारांतर्फे येथील राजेंद्र बेहरे यांनी केला आहे.प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नद्या, तलाव, विहिरी आदी जलस्रोत प्रदूषित होत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्थांकडून जनजागृती केली जात आहे. मात्र महसूल प्रशासनाकडून माती उपलब्ध होत नसल्याने नाईलाजास्तव काही कलावंत प्लॅस्टर आॅफ पॅरिसकडे वळले आहे. शासनाकडून अडथळे येत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाल्यांचे शिक्षण कसे करावे, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. माती उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. ओली झालेली माती बारिक होत नाही. त्यामुळे येणाºया दुर्गोत्सव काळात मूर्ती घडवायच्या कशा, हा प्रश्न मूर्तीकारांपुढे निर्माण झाला आहे. वीटभट्टीसाठी मातीची परवानगी दिली जाते. मूर्तीकारांना का नाही, असा प्रश्न उपलब्ध करण्यात आला आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी राजेंद्र बेहरे यांनी केली आहे. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी यासंदर्भात महसूल व वनविभागाची मंत्रालयात बैठक होत आहे. यात होणाºया निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.