शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआय म्युच्युअल फंड’च्या परताव्यासाठी गुंतवणूकदाराला येरझारा

By admin | Updated: February 18, 2017 00:19 IST

स्टेट बँकेच्या म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला परताव्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने येरझारा माराव्या लागत

एसबीआय म्युच्युअल फंड’च्या परताव्यासाठी गुंतवणूकदाराला येरझारा यवतमाळ : स्टेट बँकेच्या म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला परताव्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने येरझारा माराव्या लागत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंघानियानगर येथील गजानन दादाराव राजगुरे यांनी थेट स्टेट बँकेच्या मुंबई येथील महाव्यवस्थापकांकडे १६ फेब्रुवारी रोजी दाद मागितली आहे. राजगुरे यांनी ५ जुलै २००७ रोजी एसबीआय म्युच्युअल फंडचे ५०० युनिट खरेदी केले होते. आठ वर्षानंतर त्याचा परतावा मिळण्याची वेळ आली. म्हणून त्यांनी सप्टेंबर २०१६ ला स्थानिक एसबीआय कार्यालयातील म्युच्युअल फंड संबंधी नियुक्त कर्मचारी विनय वाघमारे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी जादा शिपाई नसल्याने तुमचे पाकीट चेन्नईला परत पाठविल्याचे सांगितले. या पाकिटाबाबत कुरिअर सर्व्हिस कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वारंवार येरझारा मारुनही वाघमारे यांच्याकडून समाधान झाले नाही. गजानन राजगुरे २ फेब्रुवारीला पुन्हा बँकेत गेले असता वाघमारे यांच्याकडील काम स्वप्नील तुरखडे यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते. तुरखडे यांची भेट होण्यास तब्बल आठ ते दहा दिवस लागले. विशेष असे त्यांचा मोबाईल क्रमांक अन्य कर्मचारी किंवा शाखा व्यवस्थापकांनाही माहीत नव्हता. तुरखडे यांनी पुन्हा पॅन कार्ड, आधार कार्ड याच्या झेरॉक्स मागितल्या. मात्र त्यांनी कॉम्प्युटर सेंटर यवतमाळ किंवा चेन्नई ट्रस्टशी संपर्क केला नाही. पर्यायाने राजगुरे यांना गुंतवणूक केलेल्या रकमेचा अद्यापही परतावा मिळालेला नाही. एकूणच एसबीआय म्युच्युअल फंडच्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांना प्रचंड त्रास होत असल्याचे उघड झाले आहे. यासंबंधी कर्मचारी कोण, त्याचा मोबाईल क्रमांक, त्याच्या वरिष्ठाचा नाव-क्रमांक असे काहीही स्टेट बँकेत लिहिलेले नसल्याने गुंतवणूकदार व ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत असल्याचे राजगुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. वारंवार तीच ती कागदपत्रे मागण्याच्या एसबीआयच्या पद्धतीमुळे वैताग आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)