शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांचे कामबंद

By admin | Updated: August 24, 2014 00:14 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४९ निवासी डॉक्टरांनी सोलापूर घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचे कामबंद आंदोलन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : सोलापूरच्या घटनेचा निषेधयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४९ निवासी डॉक्टरांनी सोलापूर घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचे कामबंद आंदोलन केले. सोलापूरचे निवासी डॉक्टर किरण जाधव यांनी मानसिक आणि शारीरिक तणावातून आत्महत्या केली. या डॉक्टरच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी निवासी डॉक्टरच्या मार्ड संघटनेने केली आहे. याशिवाय शासनकडे अनेक मागण्या प्रलंबित आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामबंद आंदोलन करण्यात आले. निवासी डॉक्टरांच्या कामाचे तास निश्चित करावे, डॉ. किरण जाधव यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी दक्षता समिती स्थापन करावी, सेंट्रल रेसीडंसी स्किम लागू करावी, निवासी अधिकारी, अधिव्याख्याता आणि सहयोगी प्राध्यापक, तृतीय श्रेणी आणि चतूर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावी अशी मागणी केली आहे. डॉ. किरण जाधव यांच्या कुटुंबियाना अर्थिक मदत म्हणून सर्व निवासी डॉक्टरांनी एक दिवसाचे विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील चार हजार डॉक्टरांनी विद्यावेतन दिले आहे. आंदोलन करताना अतिदक्षता विभागातील डॉक्टर उपस्थित होते. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी संघटनेने हा निर्णय घेतला, असे ‘मार्ड’चे यवतमाळ अध्यक्ष हर्षल पोपटकर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)