शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माहूर गडावर रेणुकेचा नवरात्रौत्सव

By admin | Updated: October 14, 2015 02:52 IST

आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानवर अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादात ..

भक्तांची मांदियाळी : नऊ दिवस विविध कार्यक्रम, प्रशासन सज्जपुंडलिक पारटकर  माहूरआदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानवर अश्विन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांच्या निनादात आणि उदे गं अंबे उदेच्या गजरात मंगळवारी पहाटे पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांच्या हस्ते विधिवत पूजेअर्चेनंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. नऊ दिवस विविध कार्यक्रम आयोजित असून या काळात लाखो भाविक रेणुकेच्या दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देवी महात्म्यात नवरात्रीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पराक्रमाचा, शौर्याचा पवित्र काळ. सतत नऊ दिवस रणचंडिकेने दृष्ट राक्षसांसोबत घनघोर युद्ध करून आपला पराक्रम दाखविला तो कालखंड. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीने पराक्रम करुन विजयादशमीस विजय संपादित केला. त्याच काळाला शारदीय नवरात्र असे म्हणतात. माहूर येथे नऊ दिवस नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित आहे. अश्विनशुद्ध प्रतिपदा १३ आॅक्टोबर रोजी विधीवत पूजेने उत्सवाला प्रारंभ झाला. रेणुकेच्या पूजेअर्चेनंतर मंदिर परिसरातील श्री तुळजाभवानी मंदिर, परशुराम मंदिर, महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीचा कलश व त्यात नागवेलीची पाने, श्रीफळ आणि सभोवताल उसाचे धांडे उभारून घटस्थापना करण्यात आली. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदिरात अखंड नंदादीप तेवत राहणार आहे. दररोज पायस म्हणजे दहीभात, पुरणपोळीचा नैवेद्य, आरतीनंतर छबिना काढला जाईल. रेणुका ज्या गडावर प्रगटली त्या गडाला प्रदक्षिणा घालून छबिना रेणुका मंदिरात परत येतो. भाविकांसाठी महाप्रसादासोबत सप्तशती शतचंडी ग्रंथाचे पठण, महाआरती, महापूजा कार्यक्रम घेतले जाणार आहे.