शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नोंद ७०० गाड्यांची खरेदी केवळ १५ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे.

ठळक मुद्देकापसाची करुण कहाणी : सीसीआयच्या दिरंगाईने मानसिक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतकऱ्याला कापसाचे उत्पादन घेण्यासाठी जितके परिश्रम घ्यावे लागले नाही त्यापेक्षा अधिक घाम तो कापूस विकण्यासाठी गाळवा लागत आहे. त्यातही कापसाचा मोबदला कधी मिळेल याचा नेम नाही. कापूस खरेदी केंद्रावर ७०० गाड्यांची नोंद आहे. मात्र दिवसाला केवळ १५ गाड्या मोजल्या जातात. अशी करुण कहाणी पांढऱ्या कापसाची आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. हा घरात साठवलेला कापूस पावसाळा तोंडावर आला असूनही बाजारात विकण्याची सोय नाही. खासगी खरेदीदार अतिशय पडेल दरात कापूस मागत आहे. शासनाने सीसीआयच्या माध्यमातून सुरू केलेली कापूस खरेदी मंद गतीने सुरू आहे. अशा स्थितीत शेतकरी या कापसाचे करायचे काय, या विवंचनेत अडकला आहे. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्या तुलनेत कापसाचे मोजमाप होताना दिसत नाही. दिवसाला १० ते १५ गाड्या कापूस मोजला जातो. या गतीने कापूस खरेदी सुरू राहिल्यास पुढचा खरीप हंगाम संपला तरी मागच्या खरिपाच्या कापसाची खरेदी संपणार नाही, अशी अवस्था आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले जात आहे. स्थानिक पातळीवरून सीसीआय व पणनच्या यंत्रणेला सूचनाही दिल्या जातात. मात्र या सूचनांची कोणतीच दखल ही यंत्रणा घेताना दिसत नाही. इतकेच काय, ज्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला त्याच्या मोबदल्याचीही रक्कम अडकून पडली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज आहे. हंगाम सुरू असूनही बी-बियाणे, खत घेण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.नेर बाजार समितीत तूर, चना, सोयाबीन विक्रीसाठी तीन हजार २१२ नोंदी झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत नाफेडने एक हजार १५० शेतकºयांनाच खरेदीसाठी बोलाविले. अजूनही दोन हजार ६२ शेतकरी धान्य विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे.राष्ट्रवादीचे नेर तहसीलदारांना निवेदनशेतकऱ्यांचा शेतमाल कापूस व इतर धान्य वेळेत खरेदी करून मोबदला द्यावा यासाठी प्रशासनाने तत्काळ नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांनी बाजार समिती सभापती भाऊराव ढवळे यांना दिले. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांनाही निवेदन दिले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी