सील केलेल्या भागाचे क्षेत्र कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:29+5:30

एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बसस्थानक ते टीबी हॉस्पिटल, सूचकनगर-महादेव मंदिरकडे जाणारा मार्ग, दत्त चौकाकडे जाणारा मार्ग आदी परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. आधीच दोन महिन्यांपासून व्यापार-व्यवसाय बंद आहे. त्यात २८ दिवसांसाठी महादेव मंदिर मार्ग परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्याने व्यापारी-व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

Reduce the area of the sealed area | सील केलेल्या भागाचे क्षेत्र कमी करा

सील केलेल्या भागाचे क्षेत्र कमी करा

Next
ठळक मुद्देनिवासी उपजिलहाधिकाऱ्यांना निवेदन : नेताजी भवन ते बसस्थानक परिसर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याच्या कारणावरून बसस्थानक व तेथून चौफेर काही परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. या सील केलेल्या भागाचे क्षेत्र आणि दिवस घटविण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी महादेव मंदिर रोड परिसरातील व्यापारी-व्यावसायिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांना निवेदन सादर केले.
एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बसस्थानक ते टीबी हॉस्पिटल, सूचकनगर-महादेव मंदिरकडे जाणारा मार्ग, दत्त चौकाकडे जाणारा मार्ग आदी परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. आधीच दोन महिन्यांपासून व्यापार-व्यवसाय बंद आहे. त्यात २८ दिवसांसाठी महादेव मंदिर मार्ग परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आल्याने व्यापारी-व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे सील एरियाचे क्षेत्र घटवावे, बसस्थानक मार्गावरील पुलापासून नेताजी भवन एवढाच परिसर सील ठेवण्याची मागणी केली गेली. सदर परिसर व्यापारी-व्यावसायिकांचा आहे. दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लहान व्यापाऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. एकच जण पॉझिटिव्ह आला असून इतर सर्वजण निगेटिव्ह आहेत. त्यामुळे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र आणि दिवस कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अ‍ॅड. चेतन गांधी, डॉ. सुरेंद्र पद्मावार, अ‍ॅड. अनिल अटल, गणेश लाहोटी आदी उपस्थित होते.

Web Title: Reduce the area of the sealed area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.