शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाववासीयांच्या अपेक्षांवर फेरले पाणी

By admin | Updated: June 15, 2014 23:48 IST

पाणीटंचाईने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेने चार कोटी २९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला. यात राळेगाव तालुक्याचा कृती आराखडा केवळ सात लाख चार हजार रुपयांचा आहे.

के.एस. वर्मा - राळेगावपाणीटंचाईने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेने चार कोटी २९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला. यात राळेगाव तालुक्याचा कृती आराखडा केवळ सात लाख चार हजार रुपयांचा आहे. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात जिल्ह्याच्या सर्व सोळाही तालुक्याचा विचार करता किमान १६ टक्के निधीची पाणीटंचाई कृती आराखड्यात तरतूद होईल, अशी अपेक्षा असताना झालेली तरतूद पावणेदोन टक्केही नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तीन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, चार पंचायत समिती सदस्य, या भागातून भरपूर लीड मिळालेले खासदार, येथील आमदार विधानसभा उपाध्यक्ष असतानाही इतकी कमी तरतूद झाल्याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. राळेगाव शहरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. येथे आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. काही ठोस पावले उचलण्यासाठी येथे भरपूर तरतूद आराखड्यात राहील, अशी अपेक्षा असताना केवळ दोन खासगी विहिरीच्या अधिग्रहणावर दोन लाख रुपये खर्चच आराखड्यात दर्शविण्यात आला आहे. सरासरी २७ लाख रुपयांची कामे प्रत्येक तालुक्यात अपेक्षित असताना येथे केवळ सात लाखांचा आराखडा दिल्याने २० लाखांची कामे कमी होणार आहे. आता तर जून महिना सुरू झाला आहे. आगामी दिवसात पावसाळा सुरू होवून पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार आहे. पण प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मात्र या शहराची आणि तालुक्याची फार मोठी निराशा केली आहे.