पांढरकवडातील पहापळला वादळी पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:23+5:30

मंगळवारी सायंकाळी झुली तांडा, पहापळ, दहेली तांडा, लिंगटी, बोथ या परिसरात अचानक जोरदार वादळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसाने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली. अनेक झाडेदेखील या वादळामुळे पडली. झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्या. शेतात उभ्या असलेल्या गहू व ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Rain at Pahapal in Pandharkawada | पांढरकवडातील पहापळला वादळी पावसाने झोडपले

पांढरकवडातील पहापळला वादळी पावसाने झोडपले

ठळक मुद्देगहू, ज्वारी पिकांचे नुकसान : अनेक झाडे उन्मळून पडली

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : तालुक्यातील पहापळ व परिसरातील काही गावांना मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे गहू, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मंगळवारी सायंकाळी झुली तांडा, पहापळ, दहेली तांडा, लिंगटी, बोथ या परिसरात अचानक जोरदार वादळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या वादळी पावसाने परिसरातील नागरिकांमध्ये धावपळ उडाली. अनेक झाडेदेखील या वादळामुळे पडली. झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या तारांवर पडल्या. शेतात उभ्या असलेल्या गहू व ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहापळ येथील नंदकिशोर काळे यांच्या चार हेक्टर शेतातील गव्हाचे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहे. बोथ येथील रोहन ठाकरे यांच्या पाच एकरातील ज्वारीचे पीकसुद्धा उद्ध्वस्त झाले आहे. शंकर भोयर यांच्या चार एकरातील ज्वारीचे तर प्रज्वल ठाकरे यांच्या पाच एकरातील ज्वारीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रकाश एलकुंचवार यांच्या तीन एकर शेतातील ज्वारीचे पीक पूर्णत: झोपून गेले आहे. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका पहापळ व बोथ या गावांना बसला आहे. शासनाने कृषी विभागामार्फत सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Rain at Pahapal in Pandharkawada

टॅग्स :Rainपाऊस