शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल ठाकरे यांची लाडखेड सर्कलमध्ये दमछाक

By admin | Updated: October 6, 2014 23:19 IST

विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी यवतमाळ विधानसभेतील लाडखेड, वडगाव गाढवे व बोरीअरब सर्कल दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा हा

यवतमाळ : विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होण्यापूर्वी यवतमाळ विधानसभेतील लाडखेड, वडगाव गाढवे व बोरीअरब सर्कल दारव्हा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा हा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. आता याच मतदारसंघाचा भाग यवतमाळ विधानसभेशी जोडला आहे. येथून राहुल ठाकरे काँग्रेसचे उमेदवार असून त्यांना सर्वाधिक आव्हान वडिलाच्या पूर्वाश्रमीच्या मतदारसंघात मिळत आहे. येथे फिरण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते नसल्याने दारव्ह्यातून कुमक बोलवावी लागत आहे. लाडखेड, वडगाव गाढवे या सर्कलमध्ये सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र आता परिस्थिती बदलली असून या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जोरदार फिल्डींग लावली आहे. पूर्वाश्रमीच्या मतदारसंघातच काँग्रेस उमेदवाराची दमछाक होताना दिसत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून गेल्याचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच सिद्ध झाले आहे. या सर्कलमध्ये काँग्रेसच्या दारव्हा तालुका अध्यक्षाला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारात लढत झाली होती. आजही हेच समीकरण या सर्कलमध्ये कायम आहे. ज्या सर्कलच्या भरोशावर राहुल ठाकरे यांनी यवतमाळ विधानसभेवर दावा केला तेथेच त्यांना फिरण्यासाठी कार्यकर्ते मिळताना दिसत नाही. सर्कलमधील काँग्रेस गटातटात विखुरली आहे. अंतर्गत वादांमुळे काँग्रेसला अजूनही येथे सूर गवसलेला नाही. जुन्या कार्यकर्त्यांना या पूर्वी आलेला अनुभव लक्षात घेता आता अनेकांनी सावध पवित्रा घेतला आहे. या सर्कलमध्ये बोरीअरब, लाडखेड, वडगाव, देऊरवाडी लाड, पांढुर्णा या मोठ्या गावांचा समावेश आहे. येथेही काँग्रेससाठी पोषक वातावरण दिसत नाही. अनेक गावात तर काँग्रेसच्या उमेदवारासोबत फिरण्यासाठीही कोणी पुढे यायला तयार नाही. ज्या जिल्हा परिषद सर्कलच्या भरोशावर राहुल ठाकरे यांनी यवतमाळ विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली तेथेच त्यांना प्रचंड शक्ती खर्च करावी लागत आहे.