शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

घोन्सात वेकोलिने घातला नैसर्गिक नाल्यावरच घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

घोन्सा गावाजवळून वाहणारा नाला हा फुलोरा (उजाड) व घोन्सा शिवेमधून येतो. फुलोरा तलावाचे पाणी या नाल्याद्वारे थेट वर्धा नदीत पोहोचते. मात्र अलीकडेच वेकोलिने घोन्सा खुल्या खाणीतील मातीचा ढिगारा या नाल्यावर टाकल्याने हा नालाच बंद झाला आहे. यासंदर्भात घोन्सा ग्रामपंचायतीने १ जूनला थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वेकोलिने नाला बंद करताना त्याचा प्रवाह एका बाजूने वळता करून तो थेट विदर्भा नदीपर्यंत नेला.

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : तालुक्यातील घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीत वेकोलिने अक्षरश: मनमानी सुरू केली आहे. यामुळे परिसरातील गावकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अलीकडेच वेकोलिने घोन्सा बायपासजवळून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावरच मातीचा मोठा ढिगारा उभा केल्याने पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. यासंदर्भात घोन्सा ग्रामपंचायतीने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आता वणीचे तहसीलदार निखिल धूळधर या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.घोन्सा गावाजवळून वाहणारा नाला हा फुलोरा (उजाड) व घोन्सा शिवेमधून येतो. फुलोरा तलावाचे पाणी या नाल्याद्वारे थेट वर्धा नदीत पोहोचते. मात्र अलीकडेच वेकोलिने घोन्सा खुल्या खाणीतील मातीचा ढिगारा या नाल्यावर टाकल्याने हा नालाच बंद झाला आहे. यासंदर्भात घोन्सा ग्रामपंचायतीने १ जूनला थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वेकोलिने नाला बंद करताना त्याचा प्रवाह एका बाजूने वळता करून तो थेट विदर्भा नदीपर्यंत नेला. त्यामुळे पावसाळ्यात विदर्भा नदीचे पात्र फुगून ते पाणी थेट घोन्सा व इतर गावात शिरण्याची भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात वणीचे तहसीलदार निखिल धूळधर यांनी प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी केली व तलाठ्यांमार्फत चौकशीचा अहवाल मागविला. त्यात वेकोलिवर ठपका ठेवण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने मोठ्या तीव्रतेचे स्फोट या कोळसा खाणीत घडविण्यात येत आहेत. त्यामुळे गावांना हादरे बसतच आहेत, सोबतच बारूदीचा धूर गावात शिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि मनमानीपणे स्फोट घडवित आहे. त्यानंतर आता नाला बंद करून गावकऱ्यांपुढे नवे संकट उभे केले आहे.

अनुचित घटना घडल्यास वेकोलि जबाबदार    नाला बंद केल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्यास व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी वेकोलि प्रशासन जबाबदार राहील, असे पत्रच तहसीलदारांनी वेकोलिला दिले आहे. पूर परिस्थिती टाळायची असेल, तर हा नाला पूर्ववत करावा, अशा सूचनाही तहसीलदारांनी पत्रातून वेकोलिला दिल्या आहे. आता वेकोलि कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदार