वेगळ्या विदर्भासाठी बसपाचे जिल्हा कचेरी समोर धरणे

By Admin | Updated: September 3, 2014 23:44 IST2014-09-03T23:44:53+5:302014-09-03T23:44:53+5:30

बहुजन समाज पार्टीच्यावतीने स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन छेडले असून, त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भाच्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणे नियोजित होते. त्याचाच भाग म्हणून बुधवारी येथील जिल्हा

To put a separate Vidarbha in front of BSP's District Cemetery | वेगळ्या विदर्भासाठी बसपाचे जिल्हा कचेरी समोर धरणे

वेगळ्या विदर्भासाठी बसपाचे जिल्हा कचेरी समोर धरणे

यवतमाळ : बहुजन समाज पार्टीच्यावतीने स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन छेडले असून, त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भाच्या जिल्हा मुख्यालयासमोर धरणे नियोजित होते. त्याचाच भाग म्हणून बुधवारी येथील जिल्हा कचेरीसमोर बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून लक्ष वेधले.
बसपाचे प्रदेश सचिव पंडीत दिघाडे, जिल्हा प्रभारी प्रकाश राऊत, मोहंमद तारिक, शेख महेबूब शेख आलम, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, महासचिव मोरेश्वर शिरभाते, रूपेश टिपले, सुनंदा वालदे, बीना भगत आदींच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
वेगळ््या विदर्भाच्या मागणीला विरोध करणारे राजनितीक पक्ष आणि शासनाच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांची वेगळ््या विदर्भाच्या अनुषंगाने भाषणे झाली. बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. त्यामध्ये विदर्भाच्या जनतेच्या हिताकरिता आणि येथील असंतुलित विकासाला ध्यानात ठेऊन वेगळा विदर्भ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी रमेश गायकवाड, देवेंद्र गणवीर, नीलेश स्थूल, संजय तरवरे, रवी शंभरकर, प्रकाश शेंद्रे, प्रफुल्ल शंभरकर, सुनील रामटेके, हेमंत सुखदेवे, रमेश कांबळे, रविता भोवते, माधुरी फेंडर, शोभना कोटंबे, बळीराम नेवारे, संतोष जाधव, नगरसेवक हरीश पेल्लारे, टोनु मेश्राम, ज्योती खोब्रागडे, ज्योती आडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: To put a separate Vidarbha in front of BSP's District Cemetery