शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
2
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
3
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
4
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
5
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
6
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
7
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
8
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
9
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
10
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
11
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
12
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
13
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
14
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
15
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
16
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
17
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
18
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
19
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
20
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पुसदची जीवनदायी पूस प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: April 24, 2015 01:19 IST

कधीकाळी स्वच्छ पाण्याने खळखळ वाहणारी, उन्हाने चमचम चमकणारे पाणी आणि त्यातून पाहता क्षणीच प्रसन्न करणारी पूस नदी आता ...

पुसद : कधीकाळी स्वच्छ पाण्याने खळखळ वाहणारी, उन्हाने चमचम चमकणारे पाणी आणि त्यातून पाहता क्षणीच प्रसन्न करणारी पूस नदी आता प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. अरुंद झालेले नदीपात्र, ठिकठिणी साचलेले डबके आणि शहरातील गटाराचे पाणी यामुळे जीवनदायी पूस नदीचे वैभव हरविले आहे. पूस नदी ही गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते. या नदीसह तालुक्यात लहान नद्या आणि नाले आहेत. पूस नदी ही दक्षिण वाहिनी आहे. मुबलक पाणी आणि नदी काठची जमीन सुपीक करणारी ही जीवनदायीनी नदी गेल्या काही वर्षापासून दयनीय अवस्थेत आहे. या नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र नदीच्या पात्रात होणाऱ्या प्रदूषणाकडे कोणाचेही लक्ष नाही. शहराच्या सीमेवरून एकेकाळी खळखळून वाहणारी पूस नदी म्हणजे नगरवासियांची तृष्णा भागवणारी जीवनदायीनी. शहराचे सौंदर्य फुलविणारी ही पूस नदी आज केवळ नावालाच उरली आहे. या निसर्गनिर्मित देणगीची मानवी यंत्रनेने काळजी न घेतल्यामुळे नैसर्गिक संपत्तीची ही देणगी काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहे. नदी पात्राच्या हाकेच्या अंतरावर मानवी वस्ती असून, या वस्त्यांच्या विस्तारही काढलेला आहे. या वस्त्यांमधील नागरिकांना नेहमी दुर्गंधीयुक्त वातावरण व सरपटणाऱ्या जिवांना सामोरे जावे लागते. अशा समस्या येथे असून मानवी दोषांमुळे या नदीपात्राची वाट लागत आहे. बदलती परिस्थिती व मानवी चुकांमुळे नदीचा प्रवाह बदलत चालला आहे. प्रवाहाला खिळ बसून बाधा निर्माण झाली आहे. रेती व माती उपशामुळे नदीपात्रात छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. वाळू व जलजीव नामशेष झाले आहेत. नदीचे पात्र कमी-कमी होत चालल्याने नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या नदीपात्रात शहरातील संबंध वापराचे घाण सांडपाणी नालीव्दारे सोडले जात आहे. शहरातील घाण, केरकचरा, शौचालयातील घाण, मृत जनावरे या नदीपात्रात टाकली जातात. ट्रॅक्टर ट्रॉलीव्दारे टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे खोलगट पात्राचे सपाटीकरण झाले आहे. या पात्रात बेशरमाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पूस नदीची ही दुरावस्था पाहून सहजपणे शब्द पडता पूस नदीला गतवैभव मिळेल का, यासाठी भगिरथाची भूमिका प्रशासकीय स्तरावर कोण वठविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)