पुसदच्या महिलेचा मृत्यू, ४५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:42+5:30

‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ४१ जणांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३४ इतकी झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २०७८ झाली आहे. यापैकी १३८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर जिल्ह्यात ५७ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४८ जण भरती आहे.

Pusad woman dies, 45 positive | पुसदच्या महिलेचा मृत्यू, ४५ पॉझिटिव्ह

पुसदच्या महिलेचा मृत्यू, ४५ पॉझिटिव्ह

ठळक मुद्देकोरोना बळींची संख्या ५७ : कोरोनामुक्त झाल्याने ४१ जणांना रुग्णालयातून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने ४५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंतची एकूण मृत्यूसंख्या ५७ झाली आहे. एकूण रुग्णसंख्या २ हजार ७८ झाली असून त्यापैकी १ हजार ३८८ बरे झाले. तर आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी मृत झालेली ७५ वर्षीय महिला ही पुसद तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी होती. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या ४५ जणांमध्ये ३१ पुरुष व १४ महिलांचा समावेश आहे.
सर्वाधिक १३ रुग्ण दारव्हा तालुक्यात आढळले. त्याखालोखाल आर्णी येथे १० रुग्ण आढळले. उमरखेड तालुक्यात ५ रुग्ण आढळले असून त्यात ढाणकीतील एका पुरुषाचा समावेश आहे. पुसद, घाटंजी शहर तसेच बाभूळगावच्या डेहणीत प्रत्येक १, तसेच दिग्रस, नेर व पांढरकवडा शहरात प्रत्येकी २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या.
‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या ४१ जणांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३४ इतकी झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या २०७८ झाली आहे. यापैकी १३८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर जिल्ह्यात ५७ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १४८ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ३३ हजार ५८९ नमुने तपासणीसाठी पाठविले. यापैकी ३३ हजार ७८ प्राप्त तर ५११ अप्राप्त आहेत. तसेच ३१ हजार नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
दरम्यान शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकाऱ्यांची मॅरॉथॉन बैठक घेतली. कोरोना नियंत्रणासाठी करावयाच्या आणखी व्यापक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

शिवाजी चौक, शासकीय वसाहत, सुवर्णानगरीत रुग्ण
यवतमाळ शहरातील ८ रुग्णांची भर पडली असून त्यात शासकीय वसाहत येथील एक पुरुष, शिवाजी चौक येथील एक पुरुष, वॉर्ड क्रमांक १ येथील एक महिला, सुवर्णा नगरी येथील एक पुरुष यासह शहरातील ३ रुग्ण व यवतमाळ तालुक्यातील शेकलगाव येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: Pusad woman dies, 45 positive