शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड, महागाव तालुक्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा सोयाबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

शेतकऱ्यांनी दिवाळी सणासाठी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून विक्री केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही शेतातच ढिग मारुन आहे. या पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. सोयाबीनच्या ढिगात पाणी शिरल्याने सोयाबीनला कोंबे फुटू लागली आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीन सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकपाशी : तोंडाशी आलेला घास हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/महागाव : परतीच्या पावसाने पुसदसह उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे हाता तोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.तीनही तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत परतीचा पाऊस सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही जोरदार पावसाने तडाखा दिला. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांसह विडूळ परिसराला पावसाचा फटका बसला. सध्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी करून शेतात ढिग मारुन ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी दिवाळी सणासाठी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून विक्री केली. मात्र बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही शेतातच ढिग मारुन आहे. या पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला.सोयाबीनच्या ढिगात पाणी शिरल्याने सोयाबीनला कोंबे फुटू लागली आहे. मोठ्या प्रमाणात सोयाबीन सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी हादरुन गेले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी भयभीत आहे. दरम्यान कृषी विभागाने काही परिसरात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.शेतातील उभ्या कपाशीलाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहे. पावसामुळे बोंडे गळतीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कपाशीच्या उतारीत घट येण्याची चिंता शेतकºयांना सतावत आहे.

टॅग्स :Rainपाऊस