शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By admin | Updated: December 2, 2014 23:14 IST

आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व वेतनश्रेणी लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समजाकल्याण विभागाला दिले आहेत.

यवतमाळ : आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व वेतनश्रेणी लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समजाकल्याण विभागाला दिले आहेत.
३० एप्रिल १९९८ च्या शासन निर्णयाने राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १२ वर्ष सेवा झाल्यानंतर कालबद्ध पदोन्नती योजना लागू केलेली आहे. त्यामुळे खासगी शाळांमधून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बारा वर्षानंतर पदोन्नतीचा लाभ मिळतो आणि पद उपलब्ध नसल्यास त्या पदाची वेतनश्रेणी मिळते. परंतु राज्यातील आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अशी कालबद्ध पदोन्नती योजना लागू करण्याबाबत कुठलाही कायदा किंवा शासन निर्णय नाही. त्यामुळे समाजकल्याण अधिकारी आणि विभागीय समाजकल्याण अधिकारी यांनी आश्रमशाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ नाकारला होता.
त्या संदर्भात महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने आश्रमशाळांमधील लिपिक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, कामठी, मदतनिस या पदांवर काम करणाऱ्यांना बारा वर्ष सेवेनंतर ३० एप्रिल १९९८ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती आणि वेतनश्रेणी देण्याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु त्याची दखल न घेतल्याने यवतमाळ जिल्ह्यातील विजय ग्रेसपुंजे, के.एफ राठोड, जितेंद्र घाडगे यांच्यासह ४१ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अ‍ॅड.प्रदीप क्षीरसागर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होवून न्यायालयाने ३० एप्रिल १९९८ नुसार कालबद्ध पदोन्नती याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना लागू असल्याबाबत निर्वाळा देत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी ४१ याचिकाकर्त्यांच्या सेवा स्वतंत्रपणे तपासून बारा वर्ष पूर्ण झाल्यापासून सदर शासन निर्णयानुसार कालबद्ध पदोन्नती लागू करावी, असे आदेश दिले आहे. या आदेशामुळे याचिकाकर्त्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती अथवा वेतनश्रेणी अथवा इतर लाभ मिळणार आहेत. (प्रतिनिधी)