कोरोनाविरूद्ध लढ्यात खासगी डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:13+5:30

रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून प्रत्येकजण आपापल्यापरीने उपचार करीत आहे. अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णांची तपासणी, त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी याशिवाय इतर रुग्णांचा शोध घेऊन प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे.

Private doctor in the fight against Corona | कोरोनाविरूद्ध लढ्यात खासगी डॉक्टर

कोरोनाविरूद्ध लढ्यात खासगी डॉक्टर

Next
ठळक मुद्देसामाजिक उत्तरदायित्व : नेर येथील फिवर क्लिनिकमध्ये देत आहेत दररोज सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासन आपले प्राण धोक्यात घालून काम करीत आहे. अलीकडे मोठ्या संख्येने नेर शहरात रुग्ण आढळल्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवर मोठा ताण येत होता. शहराचे आरोग्यही आपली जबाबदारी आहे, हे भान ठेवत, आपले सामाजिक उत्तरदायित्व जपत नेर डॉक्टर्स असोसिएशनने फिवर क्लिनिकवर हजेरी लावत रुग्णांची तपासणी करीत आहे.
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीद समोर ठेवून प्रत्येकजण आपापल्यापरीने उपचार करीत आहे. अलीकडे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णांची तपासणी, त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची तपासणी याशिवाय इतर रुग्णांचा शोध घेऊन प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे.
या कठीण समयी आपणही योगदान आपल्या शहरासाठी तसेच तालुक्यासाठी देत सामाजिक उत्तरदायित्व जपावे या हेतूने नेर डॉक्टर्स असोसिएशनने सामूहिकरित्या प्रशासनाच्या मदतीला धावून जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ते शहरातील विविध फिवर क्लिनिकवर दररोज हजेरी लावत आहे. त्यांच्या माध्यमातून रुग्णांची चोख तपासणी केली जात आहे. यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

खबरदारीचे आवाहन
नेरच्या प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखावी व कोरोना संशयित कुणी आढळल्यास प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. तरुणाईने या कार्यात कोविड रक्षक बनावे. आरोग्य विभागापासून आपला आजार लपवू नये. नजीकच्या फिवर क्लिनिकला जावून तपासणी करावी, व्यापारी बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोरोना संशयित आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, अशी विनंती तहसीलदार अमोल पोवार, नगरपरिषद मुख्याधिकारी नीलेश जाधव यांनी केली आहे.

Web Title: Private doctor in the fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.