शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

केस कापल्याने कैद्याचा अधिकाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

सहायक कारागृह अधीक्षक शेख हे नेहमीप्रमाणे दुपारी कारागृहातील बराखींची पडताळणी करत होते. त्यावेळी आरोपी राहुल ऊर्फ शिणू शिंदे रा.जामनकर नगर याला शेख यांनी केस असे का कापले म्हणून विचारणा केली. त्यावरून भडकलेल्या राहुलने थेट शेख यांच्यावर हल्ला चढविला. बंद्याकडून मारहाण होत असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचारी मदतीला धावून आले. मात्र त्यानंतर कारागृहातील इतर कैद्यांनी व बंद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देकारागृहात तनावाची स्थिती : पोलीस कुमक पोहोचल्याने नियंत्रणात

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या बंद्याने मंगळवारी दुपारी जेलरवर हल्ला केला. यानंतर कारागृहात अनागोंदी निर्माण झाली. सर्वच कैदी जोरजोराने ओरडून गोंधळ घालू लागले. कारागृहातील सुरक्षेचे सायरन वाजल्याने तात्काळ पोलीस पथक कारागृह परिसरात दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.सहायक कारागृह अधीक्षक शेख हे नेहमीप्रमाणे दुपारी कारागृहातील बराखींची पडताळणी करत होते. त्यावेळी आरोपी राहुल ऊर्फ शिणू शिंदे रा.जामनकर नगर याला शेख यांनी केस असे का कापले म्हणून विचारणा केली. त्यावरून भडकलेल्या राहुलने थेट शेख यांच्यावर हल्ला चढविला. बंद्याकडून मारहाण होत असल्याचे लक्षात येताच इतर कर्मचारी मदतीला धावून आले. मात्र त्यानंतर कारागृहातील इतर कैद्यांनी व बंद्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जोरजोराने आरडाओरडा सुरू झाला. मदतीसाठी सायरन वाजवण्यात आले. हा आवाज ऐकून कारागृह कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे पथकासह परिसरात दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. राहुल ऊर्फ शिणू शिंदे याने १४ डिसेंबर २०१९ रोजी विनेश राठोड या युवकाचा वाघापूर टेकडी परिसरात खून केला होता. त्या आरोपातच तो कारागृहात आहे. कारागृहातील अशा कुख्यात आरोपींना येरवाडा व नागपूर कारागृहात पाठविणार असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने अशा बंद्यांची यादीच तयार केली आहे.

टॅग्स :jailतुरुंगPoliceपोलिस