शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या दरापेक्षा बियाण्यांची किंमत दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी सोयाबीन विक्रीचा सपाटा लावला आहे. बाजारात सोयाबीन ३५०० ते ३६०० रूपये क्विंटलपर्यंत विकले जात आहे. सोयाबीन बियाणे बॅगचे दर ७० ते ९० रूपये किलो आहे. सात ते नऊ हजार रूपये क्विंटल दराने बियाणे विकले जात आहे. सोयाबीनपेक्षा बियाण्याचे दर दुप्पट आहेत.

ठळक मुद्देकृषी विभाग म्हणतो, घरचेच सोयाबीन पेरा : ‘त्या’ पत्रकाने शेतकरी संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिप हंगाम तोंडावर असताना बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यातून कृषी विभागाने शेतकऱ्यांना यंदा घरचेचे बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे काही शेतकरी बियाण्यासाठी म्हणून आपल्याकडील सोयाबीन विकत आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनचा बाजारातील दर साडेतीन हजारांच्या घरात असताना आता बियाण्यासाठी हे सोयाबीन ७ ते ९ हजार रुपयांच्या भावाने दिले जात आहे.गतवर्षी सोयाबीन काढणीच्या काळात परतीचा पाऊस बरसला. यात सोयाबीन बिज निर्मिती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा फटका बिजोत्पादनाला बसला. बिजोत्पादन कंपन्यांनी यावर्षी सिड निर्मिती केली. मात्र त्याचे प्रमाण काही ठिकाणी कमी झाले आहे. याचा असर बाजारपेठेवर झाला आहे.तरीही मागणीच्या तुलनेत बियाणे कमी पडणार नाही, असे कृषी विभाग एकीकडे म्हणत आहे. तर दुसरीकडे घरचेच बियाणे वापरा, असे पत्रकही कृषी विभागाने काढले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. शेतकऱ्यांना बिजोत्पादनक्षम बियाणे तयार करता यावे म्हणून प्रत्येक गावामध्ये प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. एक वर्ष पेरलेले बियाणे पुढील दोन वर्षे उत्पादनक्षमता पाहून वापरता येते.सोयाबीन ३५००, बियाणे ७००० रूपयेशेतकऱ्यांनी बियाण्यासाठी सोयाबीन विक्रीचा सपाटा लावला आहे. बाजारात सोयाबीन ३५०० ते ३६०० रूपये क्विंटलपर्यंत विकले जात आहे. सोयाबीन बियाणे बॅगचे दर ७० ते ९० रूपये किलो आहे. सात ते नऊ हजार रूपये क्विंटल दराने बियाणे विकले जात आहे. सोयाबीनपेक्षा बियाण्याचे दर दुप्पट आहेत.बियाण्याच्या किमती महाग आहेत. अशा स्थितीत घरगुती बियाणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. यामुळे कृषी विभागाने सोयाबीनचे बियाणे घरगुतीच वापरावे अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रकच काढले आहे.- नवनाथ कोळपकर,कृषी अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती