शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

अवाजवी देयकांमुळे विद्युत ग्राहक त्रस्त

By admin | Updated: September 29, 2014 00:53 IST

गेल्या काही महिन्यांंपासून या परिसरातील ग्रामस्थांना प्रत्यक्षातील रिडींगपेक्षा अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे़ वाढीव रिडींगच्या प्रकाराकडे वीज वितरण कंपनीच्या

नांदेपेरा : गेल्या काही महिन्यांंपासून या परिसरातील ग्रामस्थांना प्रत्यक्षातील रिडींगपेक्षा अधिक देयक देऊन महावितरणतर्फे लूट करण्याचा प्रकार घडत आहे़ वाढीव रिडींगच्या प्रकाराकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.नांदेपेरा परिसरातील ग्रामस्थांना भरमसाठ वीज देयक येत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहे़ रिडींग घेणारे कर्मचारी हे अप्रशिक्षीत असल्यामुळे मीटरमधील कोणता आकडा रिडींगचा आहे, हेसुद्धा त्यांना कळेनासे झाले आहे. योग्य माहिती नसल्यामुळे ते कर्मचारी जो आकडा दिसेल, त्याचे छायाचित्र काढून त्याप्रमाणे देयक तयार करीत आहेत. त्यावरूनच वीज वितरण कंपनी आकारणी करून ग्रहकांच्या माथी तेंच देयक थोपवित आहे. वाढीव देयकामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ वीज देयक दुरूस्ती करण्याकरिता ग्राहक महावितरण कार्यालयात गेले असता तेथील कर्मचारी त्यांना सहकार्य करीत नाही तेथे कर्मचारी असलेच तर ते ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवितात. तुमचे देयक बरोबर आहे, तुम्ही पैशाचा भरणा करा, अन्यथा वीज कापण्यात येईल, असे सांगून ग्राहकांना हाकलून लावतात.महावितरणचे कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयाचे अंतर दोन किलोमीटरचे आहे़ कनिष्ठ अभियंता कार्यालयात बहुतांश वेळा दिसतच नाही. देयक कमी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अनेकदा येरझारा माराव्या लागतात. हा नेहमीचाच प्रकार असून रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणतेही निर्बंध अद्याप लावण्यात आले नाही. परिणामी अंदाजे रिडींग घेण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मात्र ऐनवेळी अवाजवी देयक येत असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहे. त्यांच्या नियमित घर खर्चावरही परिणाम होत आहे. (वार्ताहर)