शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वणीत राजकीय भूकंपाची शक्यता; इच्छुकांची  जोरदार तयारी, मुंबईत ठिय्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:06 IST

वणी विधानसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महत्वाचे राजकीय पक्ष राजकारणात सक्रीय आहे.

- संतोष कुंडलकर

वणी (यवतमाळ) : राजकीयदृष्टीने संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वणी विधानसभा मतदार संघातील सर्वच पक्षातील इच्छुक मुंबईत ठिय्या देऊन आहेत. विविध राजकीय पक्षांत युती-आघाडी झाली तरी, वणीत मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

वणी विधानसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महत्वाचे राजकीय पक्ष राजकारणात सक्रीय आहे. वंचित बहुजन आघाडीनेही या मतदार संघातून उमेदवार उभा करण्याची तयार चालविली आहे. वणीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी शिगेला पोहचली आहे. प्रस्थापित नेत्याला शह देण्यासाठी विरोधी गटाने जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. भाजपशी युती झाल्यास हा गट बंडखोरीचा मार्ग अवलंबण्याची शक्यता आहे. इकडे कॉंग्रेसमध्येही चेहरा बदलविण्याचे प्रयत्न चंद्रपुरातून सुरू आहेत. त्यामुळे वणीतील कॉंग्रेसच्या निष्ठावंताच्या गटात प्रचंड अस्वस्थता आहे.

कॉंग्रेसच्या वाटेवर असलेल्या एका स्थानिक नेत्याला कॉंग्रेसची तिकीट देण्याचा घाट चंद्रपुरातून घातला जात आहे. जर कॉंग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेल्या नेत्याला तिकीट दिली गेली तर कॉंग्रेसचा प्रस्थापित गट काय भूमिका घेईल, हा देखील सर्वांच्या औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. आघाडीच्या जागा वाटपात आतापर्यंत वणी मतदार संघ कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. मात्र या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या मतदारसंघावर जोरदार दावा केला आहे. त्यासाठी परळीतील एक वरिष्ठ नेत्याच्या मित्रप्रेमाची मदत घेतली जात आहे. त्यात कितपत यश येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या सदर दावेदारासह शिवसेनेतील बहुतांश इच्छुक आठवडाभरापासून मुंबईत ठिय्या देऊन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कोणतीही दुफळी नसल्याने या पक्षापुढे कोणतेही राजकीय संकट नाही. या पक्षाचीदेखील निवडणूक लढण्याची तयार सुरू आहे.वणीत वादळापूर्वीची शांततानिवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी जारी होऊ शकते. असे असतानाही वणी विधानसभा क्षेत्रात अद्याप पाहिजे तसा राजकीय माहौल तयार झालेला नाही. सर्वत्र शांतता दिसून येत आहे. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे मानले जात आहे. युती-आघाडीची घोषणा झाल्यानंतर वणी विधानसभा मतदार संघात कोणत्या घडमोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळvidhan sabhaविधानसभा