शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

By admin | Updated: September 12, 2016 01:45 IST

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मागण्या न्याय्य स्वरुपाच्या असून, त्या सोडविण्यासंदर्भात सरकारची सकारात्मक

विज्युक्टाचा पुढाकार : शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक पुसद : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या मागण्या न्याय्य स्वरुपाच्या असून, त्या सोडविण्यासंदर्भात सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन अर्थात विजुक्टा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. याप्रसंगी २४ वर्षानंतर पात्रता निकष अनुलक्षून सर्वांना निवडश्रेणीसह तब्बल दहा मागण्या मान्य करण्यात आल्यात. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विज्युक्टा पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्र्यांच्या दालनात उत्साहात पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार रामनाथ मोते, शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक भाऊ जरंग, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भाऊ म्हमाणे, सहसचिव राजेंद्र पवार, भाऊ गुंजाळ, अवर सचिव भाऊ कापडणीस, महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे अध्यक्ष प्रा.डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. संजय शिंदे, प्रा. तळेकर उपस्थित होते. शासनाच्या सकारात्मक भूमिकेकडे राज्यातील ६५ हजार कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी विज्युक्टाने वेळोवेळी आंदोलने उभारली असून त्याला आता यश येत आहे. (प्रतिनिधी)