शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीसाठी राजकीय दबाव; पणन अध्यक्षांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:14 IST

मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे. यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे, असा सनसनाटी आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी केला.

ठळक मुद्देगुन्हे नोंदविण्याची धमकी 

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे. यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे, असा सनसनाटी आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी केला. कापूस खरेदीच्या आजच्या परिस्थितीवर ते प्रस्तुत प्र्रतिनिधीशी बोलत होते.दबावातून खरेदी झालेला कापूस आता उघड्यावर आहे. राज्यात पावसामुळे साडेतीन लाख क्विंटल कापूस ओला झाला. सध्या कापूस खरेदी केंद्रांवर जागा शिल्लक नाही. या स्थितीत कापूस खरेदी कसा करणार, असा सवाल त्यांनी केला, असे सांगून नुकसान टाळण्यासाठी तूर्त कापूस खरेदी बंद केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पणन महासंघ राज्यातील १२७ केंद्रांवर कापूस खरेदी करीत आहे. सीसीआय जोपर्यंत कापूस खरेदी करणार, तोपर्यंत पणन महासंघही कापूस खरेदी करणार आहे. परिस्थिती तयार झाल्यावर खरेदीला सुरुवात होईल, असे ते म्हणाले.राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक वाहनांचे मोजमाप करण्यासाठी आदेश काढले आहे. यातून कापूस संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात कापूस आला. आता हा कापूस ठेवण्यासाठी जागा राहिली नाही. कापूस, सरकी, गाठी उघड्यावर आहे. हजारो क्विंटल कापसाचे जिनिंग बाकी आहे. उघड्यावर पडलेला कापूस रविवारी मान्सून पूर्व पावसाने ओला झाला. आता हा कापूस वाळविण्यासाठी जागा शिल्लक नाही. कापूस ओलाच राहिला, तर काळा पडून खराब होण्याचा धोका आहे. यामुळे पणन महासंघ नुकसानीची जबाबदारी घेणार नसल्याचे अध्यक्ष देशमुख यांनी स्पष्ट केले.जिल्हा प्रशासन परस्पर आदेश काढून मोकळे होत आहे. जेथे साठवण क्षमता आहे, जिनिंगची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी कापूस खरेदी पुढील काळात होणार आहे. शेतकऱ्यांचा कापूस सुरक्षित राहावा आणि शासनाचेही नुकसान होऊ नये, या पद्धतीने खरेदी आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस