शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील संवदेनशील ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची पूर्णवेळ गस्त होती. शनिवारी सकाळी अयोध्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. चहाटपऱ्या व चौकांमध्ये निकालाबाबत चर्चेचे फड रंगले. मात्र याचा येथील दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम दिसला नाही. प्रशासनाने केवळ दक्षता म्हणून बंदोबस्त लावला व इतर योग्य ती खबरदारी घेतली.

ठळक मुद्देराखीव दलाची तुकडी तैनात । शाळांनाही दुपारच्या सत्रात दिली सुट्टी

अयोध्या निकाललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अयोध्येतील जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. तत्पूर्वी सामाजिक शांतता कायम राहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन केले होते. संपूर्ण जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारच्या सत्रात शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली.जिल्ह्यातील संवदेनशील ठिकाणी शुक्रवारी रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची पूर्णवेळ गस्त होती. शनिवारी सकाळी अयोध्या निकालाबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. चहाटपऱ्या व चौकांमध्ये निकालाबाबत चर्चेचे फड रंगले. मात्र याचा येथील दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम दिसला नाही. प्रशासनाने केवळ दक्षता म्हणून बंदोबस्त लावला व इतर योग्य ती खबरदारी घेतली. महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता. बाजारपेठेतही नेहमीसारखीच वर्दळ होती. निकालाबाबत प्रत्येक जण कानोसा घेत होता. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील शाळांना दुपारी सुटी देण्यात आली. याबाबत शिक्षण संचालक स्तरावरून सूचना असल्याचे सांगण्यात आले. दारव्हा येथे सर्वधर्मीयांनी शांतता रॅली काढून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन केले. यवतमाळात अवधुतवाडी ठाण्यांतर्गत काही जणांकडून फटाके फोडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. राज्य राखीव दलाची एक कंपनी व दोन प्लाटून जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या. याशिवाय १२०० गृहरक्षक दलाचे जवान आणि जिल्हा पोलीस दलातील २ हजार ७०० अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर होते.व्हॉट्सअप ग्रूपवर अ‍ॅडमीनचा ताबाअनेकांनी सोशल मीडियावर अयोध्या निकालावर कोणतीही टीका टिप्पणी करणारे मॅसेज व्हायरल करण्याला प्रतिबंध घातला. ज्यांनी आपले व्हॉट्सअप ग्रूप केले होते, त्या अ‍ॅडमीननी ‘ओन्ली फॉर अ‍ॅडमीन’ आॅप्शनचा वापर केला. सर्वांनीच दक्षता बाळगत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्या