शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

विजय हटकर (४२) असे अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो जिल्हा दंगल नियंत्रक पथकात कार्यरत आहे. बंदोबस्ताच्या कामासाठी त्याला उमरखेड येथे नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसांपासून तो येथील वसंतनगर भागात कृष्णा बारसकर यांच्याकडे भाड्याच्या घरात राहात होता. याच काळात त्याने घृणास्पद कृत्य केल्याचे पुढे आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पोलिसाच्या घरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह शुक्रवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा पुढे आला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली. अखेर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे नोंदवून ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली.विजय हटकर (४२) असे अटक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो जिल्हा दंगल नियंत्रक पथकात कार्यरत आहे. बंदोबस्ताच्या कामासाठी त्याला उमरखेड येथे नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसांपासून तो येथील वसंतनगर भागात कृष्णा बारसकर यांच्याकडे भाड्याच्या घरात राहात होता. याच काळात त्याने घृणास्पद कृत्य केल्याचे पुढे आले आहे.मृत २० वर्षीय तरुणी ही पुसद तालुक्यातील वेणी येथील रहिवासी आहे. या मुलीला पोलिसात नोकरी लावून देतो, त्यासाठी उमरखेड येथील खासगी पोलीस प्रशिक्षण अकादमीत प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून विजय हटकरने आपल्या घरात ठेवून घेतले. त्यातच लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मात्र, शुक्रवारी या तरुणीने हटकर याच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तरुणीचे वडील संजय कोरडे यांनी आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती तसेच शवविच्छेदन अहवालातूनही ही बाब पुढे आली. त्यावरून शनिवारी रात्री विजय हटकर याला उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी अटक केली. हटकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३०६ (२) (एन), ३६६ नुसार गुन्हे नोंदविले.

रजा घेऊन केला कारनामा- दंगल नियंत्रण पथकात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विजय हटकर याने ६ डिसेंबरपासून रजा घेतली होती, अशी माहिती ठाणेदार अमोल माळवे यांनी दिली. मात्र, याच काळात त्याने वेणी येथील तरुणीची फसवणूक करून अत्याचार केला. आता या प्रकरणात हटकर याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटकही केली आहे. त्याला २ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळाल्याचे ठाणेदार माळवे यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी