शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

धडपडणाऱ्या शेतकरीपुत्राची करूण ‘एक्झिट’

By admin | Updated: August 23, 2015 02:39 IST

उमरेड येथील आशीष अरूण कचवे (२०) या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी सकाळी केलेल्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

राळेगावात हळहळ : तरुणाच्या जाण्याने अशिक्षित आई-वडील निराधारराळेगाव : उमरेड येथील आशीष अरूण कचवे (२०) या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी सकाळी केलेल्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. जीवनात काहीतरी चांगले करू पाहणाऱ्या या तरुणाने अचानक जगातून ‘एक्झिट’ घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दहावी पास झाल्यानंतर त्याची पुढील शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेता आले नाही. घरात आजीच्या नावे ५.१७ हेक्टर शेत जमीन आहे. ही शेती त्याचे वडील वहीत करीत होते. वडील, आई, आजी अडाणी असल्याने त्या तुलनेत घरातील हा तरुण मुलगा थोडाफार शिक्षित होता. त्याच्या खांद्यावर अवेळीच शेतीचाही भार काही वर्षांपासून आला होता. शेतीचा गाडा तो कसा तरी गेल्या काही दिवसांपासून ओढत होता. आजीच्या नावावरील शेतीवर एक लाख ४६ हजार इतके कर्ज होते. रिधोरा सोसायटीचे हे कर्ज थकित होते. या शिवाय काही खासगी कर्जही त्याच्याकडे थकित होते. फवारणीच्या औषधांची व मजुरांच्या मजुरीची कशी जुळवणी करावी या विवंचनेत तो घटनेच्या दिवशी शेतात बसून होता, अशी माहिती मिळाली आहे. यातच त्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. घरी आई, वडील, आजी, लहान भाऊ असे सदस्य आहेत. म्हातारपणाची त्यांची काठी हिरावल्या गेली आहे. यावर्षी शेतात तूर व कापसाचे पीक उभे आहे. उत्पन्न बऱ्यापैकी होईल असा सर्वांचा अंदाज होता. त्यातच शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजनाही सुरू केल्या. असे असताना शासकीय अधिकारी शेतकऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे, तरीही इतका टोकाचा निर्णय आशीषने का घेतला, असा प्रश्न सर्वत्र चर्चील्या जात आहे. नागपंचमीच्या सणाला मजुरांचा चुकारा देणे अशक्य होते. या विवंचनेतूनही आशीषने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. एसडीओ जनार्दन विधाते व सहकाऱ्यांनी पीडित शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली व सांत्वन केले. (तालुका प्रतिनिधी)