शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

मे महिन्याचे मिळून ७५ टक्के वेतन कमी देण्यात आले. त्यासाठी इतर राज्याप्रमाणे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. महामंडळाचे दररोज २३ कोटी रुपये उत्पन्न बुडत आहे.

ठळक मुद्देकामगार संघटना : आर्थिक अडचणीतून बाहेर काढणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन काळात एसटीचे उत्पन्न कमी झाल्याने कर्मचाऱ्यांना मार्च आणि मे महिन्याचे मिळून ७५ टक्के वेतन कमी देण्यात आले. त्यासाठी इतर राज्याप्रमाणे शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.महामंडळाचे दररोज २३ कोटी रुपये उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि डिझेल खर्च भागविणे कठीण होऊन बसले आहे. राज्य शासनाने सवलतमूल्यापोटी प्रतीपूर्तीची रक्कम दिल्याने एसटी कर्मचाऱ्यांना माहे मार्च देय एप्रिलचे ७५ टक्के, माहे एप्रिल देय मेचे १०० टक्के आणि माहे मे देय जून २०२० चे ५० टक्के वेतन देण्यात आले. जून देय जुलैचे वेतन वाटपास येणारी आर्थिक अडचण दूर करून पूर्ण वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. तसे पत्र राज्य अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले, अशी माहिती विभागीय सचिव राहुल धार्मिक यांनी दिली.तीन राज्यात शासनाकडून आर्थिक सहाय्यलॉकडाऊन संपूर्ण देशात आहे. ही वस्तूस्थिती असली तरी उत्तर प्रदेश, कर्नाटक व तेलंगाणा राज्यात तेथील एसटी महामंडळ कर्मचाºयांसाठी शासनाने आर्थिक सहाय्य केले. या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठीही शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, असे संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.