शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणात प्रवाशांचा जीव सापडला धोक्यात

By admin | Updated: September 30, 2014 23:42 IST

वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़

बोटोणी : वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़गेल्या दोन-तीन वर्षांपासून वणी ते करंजी या राज्य मार्गाचे कासवगतीने रूंदीकरण सुरू आहे़ रस्ते हे देश विकासाच्या रक्तवाहिन्या समजल्या जाते़ परंतु या रस्ता रूंदीकरणात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहने खिळखिळी होत आहे. दररोज या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या कंबरा खिळखिळ्या झाल्या़ परिणामी वाहनासह प्रवाशांचे आयुष्य कमी होत आहे़वणी ते करंजी मार्गावरील खडकी नाल्यालगत रस्त्याचे रूंदीकरण होत आहे़ तेथे एकेरी वाहतूक सुरू असून रात्री फलकाअभावी वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण जाते़ करंजीकडून येणारे वाहन जर वेगात असेल, आणि या ठिकाणी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास किंवा बे्रेक न लागल्यास वाहन खडकीच्या नाल्यात गेल्याशिवाय राहात नाही़हीच परिस्थिती बोटोणीनजीकच्या पुलाची आहे. रस्ता रूंदीकरणानाने येथेही एकेरी वाहतूक आहे़ अर्धाअधिक रस्ता खोदल्यामुळे वाहन रस्त्याच्या खालून चालवावे लागते़ पाऊस पडल्यास तेथे चिखल साचत असल्याने वाहन पलटले जाते़ वाहनावरचे नियंत्रण सुटल्यास वाहन पुलामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे़ त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी गिट्टी, मुरूम टाकल्याने आता खड्डे पडले आहेत़पुलाचे बांधकाम रस्ता रूंदीकरणासाठी अडसर ठरत आहे़ त्यातच महावितरण कंपनीने भूमिगत वीज वाहिनीसाठी अनेक ठिकाणी आरपार रस्ते खोदले आहेत. गिट्टी, मुरूम टाकून तात्पुरती खड्ड्याची मलमपट्टी केली़ आता मात्र अनेक ठिकाणी नालीसारखे खड्डे पडत आहे़ वणी ते करंजी या ५० किलोमीटर रस्त्याचे रूंदीकरण आंध्रप्रदेशातील एका कंपनीला देण्यात आले. मात्र या कामात गैरप्रकार होत असल्याची ओरड सुरू आहे. सोमनााळा बसस्थानकानजीक डांबरीकरण उखडल्याने खड्डा पडला आहे़ मांगरूळ येथील हनुमान मंदिरानजीकच्या पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ तेथे वाहन उसळते़ मांगरूळ-वेगाव चौफुली रस्त्यावर पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ यात भ्रष्टाचार होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे़ रस्त्याच्या रूंदीकरणासाठी खोल खोदकाम करण्यात आले. मात्र काम सुरू असल्याचे फलकच गायब झाले आहे़ त्यामुळे रात्री वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते़ याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे़ (वार्ताहर)