शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

नीलगिरी वनातील पार्क १0 वर्षांपासून रखडला

By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST

वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही,

वणी : वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही, हे अजूनही जनतेला कळले नाही़वणी तालुक्यात वेकोलिच्या १५ कोळसा खाणी असल्याने हा तालुका प्रदूषणात देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. येथील जनतेला सकाळ-सायंकाळी शुध्द हवा घेण्यासाठी एखादे उद्यान शहरातही नाही व तालुक्यातही नाही़ त्यामुळे मंदरजवळील नीलगिरी वनात ‘ग्रीन पार्क’ तयार करण्याचा आराखडा गेल्या १५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता़ त्याचे स्वरूप, त्याचे अंदाजपत्रक वन विभागाने तयार करून शासनाला सादर केले होते़ नीलगिरी वन हे ठिकाण शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे़नीलगिरी वनात वन विभागाची शेकडो एकर जमीन आहे़ सुदैवाने येथे रोपवाटिका व काजूचे वन आहे़ जवळूनच निर्गुडा नदी वाहात आहे़ त्यामुळे येथे ग्रीन पार्क उभारण्याचा संकल्प वन विभागाने केला होता़ त्यात प्राणी संग्रहालय, विविध मनोरंजक खेळ साहित्य, जंगल परिसरात भ्रमण करणारी मिनी ट्रेन, विसावा कुटी, रंगीत फवारे, विविध फुलांचे बगीचे यांचा समावेश होता़ या सर्व बाबी त्यावेळी म्हणजे १५ वर्षांपूर्वी केवळ ३०-३५ लाख रूपयांत तयार होईल, असे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते़ यामुळे वणीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ विरंगुळ्यासाठी व शुध्द हवा घेण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळणार, या आनंदात वणीकर जनता होती़ मात्र हा प्रकल्प नियोजनानंतर का बारगळला, हे अद्याप कोणताच लोकप्रतिनिधीही सांगायला तयार नाही़ गेल्या १५ वर्षांपूर्वीच्याच काळात वणी शहरात वरोरा रेल्वे गेट व बायपास टी पॉर्इंट, लालपुलिया परिसर येथे खनिज विकास निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आले होते. मात्र या सौंदर्यीकरणाचा लाभ वणीकरांना घेतलाच आला नाही़ योग्य देखभालीअभावी हे सर्व सौंदर्यीकरण क्षणिक ठरले़ अल्पावधीतच सौंदर्यीकरण नेस्तनाबूत झाले. चोरट्यांनी साहित्य लंपास केले़ कोल डेपोवाल्यांनी अतिक्रमण करून त्या जागी कोळशाचे ढिगारे रचले़ अशा प्रकारे कोट्यवधी रूपयांचा खनिज विकास निधी पाण्यात गेला़ जर या निधीतून ग्रीन पार्कची उभारणी झाली असती, तर ती जनतेच्या उपयोगाची बाब ठरली असती़ याचप्रकारे दरवर्षी येणारा कोट्यवधींचा खनिज विकास निधी व्यर्थ खर्च होत आहे़ मात्र प्रदूषणाच्या चक्रव्यूहात सापडलेली जनता त्याचे चटके सहन करीत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)