शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

‘समांतर’ पोलिसांचेही खांदेपालट

By admin | Updated: September 3, 2014 00:05 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमधून वाचण्यासाठी पोलिसांनीच समांतर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हाभर वाहनधारकांकडून झीरो पोलीस वसुली करतात. पोलीस दलात झालेल्या

महागाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमधून वाचण्यासाठी पोलिसांनीच समांतर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जिल्हाभर वाहनधारकांकडून झीरो पोलीस वसुली करतात. पोलीस दलात झालेल्या फेरबदलानंतर या समांतर पोलीस यंत्रणेतही खांदेपालट झाली असून महागाव, पुसद भागात असे नवीन झीरो पोलीस दिसत आहे. जिल्ह्यात समांतर पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. याची माहिती पोलिसांनाही आहे. कारण त्यांनीच या समांतर पोलिसांना पाठबळ दिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नेहमीच पोलीस अडकतात. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली. सध्या जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. वाहतूक पोलिसांचेही फेरबदल झाले. त्याच बरोबर या समांतर पोलिसांचेही फेरबदल झाल्याचे दिसत आहे. काही पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष तेच ते वाहतूक शिपाई स्थानिक पातळीवर दिसतात. परंतु त्यांचे खास विश्वासू म्हणून याच व्यवसायात असलेले खबरे यांची मात्र खांदेपालट झालेली दिसत आहे. नेहमीचा वाहतूक शिपाई झाडाखाली बसून तर ट्रॅपच्या धाकाने झीरो पोलिसांच्या मदतीने वाहनधारकांकडून वसुली असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात काही अपवाद वगळता दिसून येते. या समांतर पोलिसाला पकडायचे म्हटले तरी कारवाई काय करणार असा सवाल उपस्थित होतो. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात असे किमान तीन ते चार झिरो पोलीस कार्यरत असल्याची माहिती आहे. आर्णी, महागाव, उमरखेड येथील अनेक जण यात गुंतलेले आहे. पोलिसांपेक्षाही अपडेट राहणारे झिरो पोलीस खऱ्या पोलिसांनाही फिके पाडतात. एखाद्या अनुभवी पोलिसासारखी भाषा वापरुन वाहनधारकांकडून वसुली करतात. परंतु आता त्यांचेही खांदेपालट झाले आहे. महागाव येथील एका अनुभवी झीरो पोलिसाला नांदेड मार्गावरील उमरखेड नाक्यावर हलविण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही झीरो पोलिसांची समांतर यंत्रणा कार्यरत आहे. (शहर प्रतिनिधी)